जाहिरात-9423439946
निवड

…या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पाडेकर यांची बिनविरोध निवड

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील राजकीयदृष्टया महत्वाच्या गणल्या गेलेल्या बहादरपूर ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या उपसरपंच निवडीत रामनाथ रखमाजी पाडेकर यांची बिनविरोध निवड झाली असल्याची माहिती निळवंडे कालवा कृती समितीचे माजी उपाध्यक्ष गंगाधर रहाणे यांनी दिली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नुकत्याच पार पडलेल्या २६ ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणूक नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.त्यात निवडणुकीत जनतेतून सर्वाधिक १५ सरपंच राष्ट्रवादी गटाचे तर भाजपचे ९ निवडून आले आहेत.यात पहिल्या टप्प्यात काल ग्रामपंचायतीपैकी १३ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांची निवडणूक पार पडली असताना आज दुसऱ्या टप्प्यातील बहादरपूर सह ०८ ग्रामपंचायतींची उपसरपंच निवडणूक पार पडली आहे.यात राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या बहादरपूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडणूक उत्साहात संपन्न झाली आहे.यात निळवंडे कालवा कृती समितीचे जेष्ठ कार्यकर्ते रामनाथ पाडेकर यांची वर्णी लागली आहे.

बहादरपूर ग्रामपंचायतीचे नूतन सरपंच गोपीनाथ पाराजी रहाणे.

या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी महाविकास आघाडी पुरस्कृत संत गोपाजी बाबा परिवर्तन पॅनल व भाजपचे माजी सरपंच कैलास रहाणे यांच्या ग्रामविकास पॅनलचा सामना रंगला होता.यात सरपंचपदी (माजी उपसरपंच) गोपीनाथ पाराजी रहाणे हे मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले आहेत.त्यांचेसोबत अन्य सहा सदस्य निवडून आले होते.त्यात भाऊसाहेब कचरू रहाणे,चित्रा रहाणे,सरला सुभाष रहाणे,कविता सोमनाथ रहाणे,निर्मला सुखदेव गोरे आदींचा समावेश आहे.तर विरोधी भाजपचे या अटीतटीच्या लढाईत तीन सदस्य निवडून आले आहे.ते असे रमेश भाऊसाहेब रहाणे,बाळासाहेब माधव खकाळे,उज्वला बाबासाहेब रहाणे आदींचा समावेश आहे.

बहादरपूर ग्रामपंचायतीचे नूतन उपसरपंच रामनाथ पाडेकर.

दरम्यान या निवडणुकीत उद्धव सेनेचे नेते शिवाजी रहाणे,महाघाडीच्या यशासाठी माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब रहाणे,निळवंडे कालवा कृती समितीचे माजी उपाध्यक्ष गंगाधर रहाणे,ह.भ.प.साईनाथ रहाणे,बी.सी.रहाणे,सुभाष रहाणे,दगडू बंडू रहाणे,अरुण प्रभाकर रहाणे,सोमनाथ रहाणे,नानासाहेब पाडेकर,आप्पासाहेब पाडेकर,मोहन पाडेकर,बाबासाहेब खकाळे,गोपीनाथ खकाळे,दत्तात्रय रहाणे,दत्तात्रय खकाळे,वामन रहाणे,एन.डी.सर रहाणे,मधुकर पवार,विठ्ठल खकाळे,माजी सरपंच जगन्नाथ जोर्वेकर,मारुती वाघ,विजय रहाणे,सतिष रहाणे,साहेबराव रहाणे आदींनी मोलाची भूमिका निभावली असल्याचे परिवर्तन पॅनलच्या वतीने माहिती देण्यात आली आहे.नूतन पदाधिकारी यांचे कोपरगाव तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close