जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सण-उत्सव

कोपरगाव नजीक असलेल्या…या विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील रेन्बो इंटरनॅशनल स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून उत्साहात संपन्न झाला आहे.

भारतात यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा येत आहे.आज पंधरा ऑगस्ट यंदा भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत.देशभरात स्वातंत्र्य दिनाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.कोपरगाव शहरासह तालुक्यात देशभरात विविध देशभक्तिपर उपक्रम आणि अभियान राबवण्यात येत आहेत.कोपरगाव येथील लहानुभाऊ नागरे यांनी स्थापन केलेल्या रेनबो इंटरनॅशनल स्कूल येथेही हा उत्साह पाहायला मिळायला आहे.

सदर कार्यक्रमासाठी विश्वभारती रुरल एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल आग्रवाल,विश्वस्त मनोज आग्रवाल,कार्यकारी संचालक आकाश नागरे,विश्वस्त विजय कडू,किरण पहिलवान,मनिष फुलफगर,कुंभारी गावाचे सरपंच प्रशांत घुले,रामनाथ आव्हाड,दत्तात्रय आव्हाड, आशोक वक्ते यांसह गावातील ज्येष्ठ नागरीक व पालकवृंद आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर कालावधीत वसतिगृह विद्यार्थ्यांच्या बँण्ड पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.याच सोहळ्यातंर्गत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेत पहिल्या तीन आलेल्या विद्यार्थ्यांचा पालकांसह गौरव करण्यात आला आहे.त्यात कृष्णाली होन,तनिष्क चव्हाण,हरिशरण कुमार,आराध्य रोकडे,युग कुदळे,नैतिक निकुंभ या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून देशभक्ती जागृत केली.देशभक्तीपर नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकुन घेतलीआहे.

सदर प्रसंगी मंगेश पाटील यांनी,”लहानुभाऊ नागरे यांच्या आठवणींना उजाळा देत अण्णा म्हणजे एक कट्टर देशभक्त आणि या देशभक्ताच्या विचारधारेवर आधारीत या शाळेत शिक्षण घेणे म्हणजे अहो भाग्यचं आणि नक्कीच एक अष्टपैलू व्यक्तीमत्व व एक आदर्श नागरीक या शाळेत घडेल असा आशावाद व्यक्त केला आहे.

सदर प्रसंगी देशभक्तीपर गीत,संगीत,नृत्य,स्वातंत्र्या वरील रांगोळी,चित्रकला स्पर्धा,भाषणे आदी कार्यक्रम संपन्न झाला आहे.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भक्ती टिळेकर,पलक ठक्कर,लब्धी कोठारी,स्वरा रोहमारे या विद्यार्थ्यांनी केले तर शाळेचे प्राचार्य सुरेश शिंदे उपस्थितांचे आभार मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close