सण-उत्सव
कोपरगाव शहरात पहाट पाडवा उत्साहात संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात शिवसेना व योग प्रचार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पहाड पाडवा’ कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात नुकताच संपन्न झाला आहे.
अश्विनातील अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. सोने खरेदीस प्राधान्य,सुवासिनींकडून पतीला औक्षण, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक बाजूंनी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले जाते.
बलिप्रतिपदेविषयी असलेल्या पौराणिक कथांनुसार पार्वतीने महादेवांना याच दिवशी द्युत खेळात हरवले म्हणून या दिवसाला द्युत प्रतिपदा असेही म्हटले जाते. या दिवशी नववर्षाची सुरुवात होते त्याचे पहाटेच्या सुमारास मधुर संगीताने स्वागत होते.असाच पाहत पाडवा नूतच कोपरगाव शहरात दि.५ नोव्हेबर रोजी संपन्न झाला आहे.
रसिकांनी यावेळी ब्राह्म मुहूर्तावर उठून,अभ्यंगस्नान करुन निसर्गरम्य वातावरणात,गंगा गोदावरी मातेच्या सहवासात,मनाला आनंद देणारी ओवी पासून अभंगापर्यंत,भूपाळी पासून भैरवी पर्यंत नाद संगीत विद्यालय,वारी.यांचा मराठी लोक कला,पारंपरिक गीतांचा सुमधुर कार्यक्रम ऐकत आपल्या दिनचर्येची सुरुवात करुन केली आहे.
सदरचा कार्यक्रम स्व.खा.सुर्यभान वहाडणे गोदावरी घाट,योग प्रचार संस्था,कोपरगाव.या ठिकाणी संपन्न झाला आहे.सदर कार्यक्रमासाठी कलविंदर सिंग दडियाल,दत्ता पुंडे,विक्रांत झावरे,संतोष होने,बाळासाहेब सांळुके,वैभव हलवाई,सतिष शिंगाणे,रोहन दरपेल,संदीप सावत्कर,भुषण वडागळे,विकास शर्मा,सुनिल कडू,राजेंद्र शिरोडे,अमित लोहाडे,नितिन डोंगरे,आदीनाथ ढाकणे, विमल पुंडे अश्विनीं होणे,राखी विसपुते,उमा वहाडणे,अर्चना लाड,सर्वणा दरपेल,लोळगे ताई,भोसले ताई,अरविंद सावजी,सुनिल भावसार,राजेंद्र भालेराव,भाऊसाहेब सांळुके यांच्या सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल म्हणाले की,कोपरगाव शहरात योग प्रचार संस्था गेल्या २२ वर्षापासून कामकाज करत आहे.हे अविरतपणे २२ वर्षे कामकाज करणे बोलणे सोपे असते पण करणे अवघड असते.दत्ता पुंडे यांच्या योग प्रचार संस्थेच्या कार्याला सलाम करुन शुभेच्छा देवुन येथून पुढेही असेच कामकाज चालु ठेवावे.असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.या कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांचे आणि प्रेक्षकांचे आभार त्यांनी मानले आहे.