सण-उत्सव
कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात…या कर्तृत्वान महिलांचा सत्कार
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नुकताच शहरातील व तालुक्यातील कर्तृत्वान महिलांचा सत्कार करण्यात आला आहे.व त्यांना शहर पोलीस ठाण्याचे कामकाज कसे चालते याची माहिती देऊन पोलीस ठाण्याबद्दल जनतेत सलेले गैरसमज दूर करण्याचा कार्यक्रम या निमित्ताने पोलीस निरीक्षक वासुसेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला आहे.
“महिला दिनानिमित्त काही देशांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना सुटी देण्यात येते.तर काही देशांमध्ये कार्यालयामध्ये महिला कर्मचाऱ्यांसाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.महिलांनी मिळवलेल्या यशाचा,अतुलनिय कामगिरीचा आढावा घेत त्यांचे अभिनंदन आणि कौतुकही या निमित्ताने करण्यात येते.कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अशा महिलांचा सत्कार करण्यात आला आहे”-वासुदेव देसले,पोलीस निरीक्षक,शहर पोलीस ठाणे.
महिला दिनानिमित्त काही देशांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना सुटी देण्यात येते.तर काही देशांमध्ये ऑफिसेसमध्ये महिला कर्मचाऱ्यांसाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.महिलांनी मिळवलेल्या यशाचा,अतुलनिय कामगिरीचा आढावा घेत त्यांचे अभिनंदन आणि कौतुकही या निमित्ताने करण्यात येते.महिलांना प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळवून देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने काही मार्गदर्शक तत्त्वे,कार्यक्रम निश्चित केले आहेत.कोपरगावात शहर पोलीस ठाण्यात महिलांना कामकाजाची संधी देण्यात आली आहे.
त्यात कोपरगांव शहरातील विवीध क्षेत्रातील महीला शबनम शेख मुख्याध्यापीका न.पा.उर्दु हायस्कुल कोपरगांव,संगीता मालकर स्वयंसेवी संस्था कोपरगांव,श्रीमती रश्मीताई जोशी स्वयंसेवी संस्था कोपरगांव,दिपाली आचारी लायन्स क्लब महीला सदस्य कोपरगांव,डॉ.तेजश्री नाईकवाडे नेत्ररोग तज्ञ कोपरगांव,मंगला राजेभोसले पर्यवेक्षीका डॉ.सी.एम.मेहता कन्या विदयामंदीर कोपरगांव,ॲङ श्रध्दा जवाद कोपरगांव कोर्ट,ॲड ज्योती भुसे कोपरगांव कोर्ट,माजी उपाध्यक्ष कोपरगांव वकील संघ,शबाना शेख शिक्षण विस्तार अधिकारी,पंचायत समिती,कोपरगाव,कु.एैश्वर्या बिडवे,कु.सुकन्या सोनवणे विदयार्थीनी कोपरगांव, श्रीमती वैशाली आढाव महीला दक्षता समीती,डॉ.अर्चना मुरुमकर महीला दक्षता समीती,श्रीमती स्वाती मुळे महीला दक्षता समीती, शिलाताई भगत महीला दक्षता समीती,ॲङ पी.बी.पाटणी महीला दक्षता समीती,लिना आचारी पोलीस पाटील संवत्सर,सविता आढाव पोलीस पाटील,शिंगणापुर,म.पो.कॉ.सुवर्णा कानवडे,म.पो.कॉ.विजया दिवे,म.पो.कॉ,मंजुषा त्रिभुवन,मपोकॉ प्रिती बनकर,महीला होमगार्ड सुनिता तांबे,महीला होमगार्ड अनिता पवार,ॲड.प्रेरणा पाटणी यांचे उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला आहे.
सदर कार्यक्रमाची सुरूवात राजमाता माँ.जिजाऊ व क्रांतीज्योती सावीत्रीबाई फुले यांचे प्रतिमांचे पुजन कार्यक्रम करुन सर्व महीलांचा आम्ही पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला व महीलांना महीला कायदयाविषयी माहीती व पोलीस स्टेशनचे कामकाज कसे चालते याबाबत माहिती देवुन महीला सक्षमीकरणाकरीता काय-काय उपाययोजना केल्या पाहिजेत या बाबत तसेच कोव्हीड अनुषंगाने योग्य खबरदारी घेणेबाबत मार्गदर्शन केले.ॲड.श्रध्दा जवाद व ॲड ज्योती भुसे माजी उपाध्यक्ष कोपरगांव वकील संघ यांनी महिलांना कायद्याविषयी मार्गदर्शन केले.
डॉ.तेजश्री नाईकवाडे नेत्ररोग तज्ञ कोपरगांव व डॉ.अर्चना मुरुमकर यांनी अरोग्य विषयी कशाप्रकारे काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.तसेच सदर कार्यक्रम दरम्यान श्रीमती वैशाली आढाव यांनी आम्हाला स्वत: फेटा बांधुन सत्कार करुन महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाही हे दाखवुन दिले आहे.
सदर कार्यक्रमादरम्यान शबनम शेख मुख्याध्यापीका न.पा.उर्दु हायस्कुल कोपरगांव यांना पोलीस निरीक्षक पदाचा व श्रीमती वैशाली आढाव महीला दक्षता समीती यांना पोलीस ठाणे अंमलदार पदाचा तात्पुरता कार्यभार देवुन पोलीस दलाचे कामकाच कसे चालते याबाबत त्यांना माहिती दिली त्यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन पोलीसांविषयी आदर निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.या कार्यक्रमास उपस्थितीत सर्व महीलांचा पुष्पगुच्छ देवुन सन्मान करण्यात आला आहे.