जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सण-उत्सव

कोपरगावात..या संस्थेचा चित्रकला स्पर्धा उपक्रम संपन्न

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील सूर्यतेज संस्थेच्या वतीने कोपरगाव फेस्टिव्हल,स्वच्छ भारत अभियान,माझी वसुंधरा अभियान अंतर्गत शिरोडे अँड सन्स यांचे सहकार्यातून शिवजयंती उत्सवानिमित्त चित्रकला स्पर्धा संपन्न झाल्याची माहिती सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी दिली आहे.

शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली,जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.त्यानंतर बाळ गंगाधर टिळक यांनी शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकजूट करण्याचे काम केले.२०व्या शतकात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील शिवजयंती साजरी केली होती ते दोन वेळा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी व्हायला लागली.या जयंती निमित्त विविध संस्था विविध कार्यक्रम साजरे करीत असतात.

कोपरगाव शहरासह ग्रामिण भागातील कोकमठाण,संवत्सर,सुरेगांव येथील प्रातिनिधिक शाळांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.कोरोना संसर्ग प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सहभागी सर्व शाळांमध्ये शालेय स्तरावर चित्रांसाठी कागद आयोजकांकडून देण्यात आले होते.तसेच स्पर्धकांनी मास्क तोंडाला लावून विशिष्ट शारिरीक अंतराने सहभाग घेतला. शालेय स्तरावर चित्र साकारण्यासाठी बसविण्याचे नियोजन करण्यात आले होते.

जागर शिव विचारांचा,उत्सव रयतेच्या राजांचा हे ब्रीद घेवून प्रत्येक सहभागी स्पर्धकांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे वृक्ष संवर्धन आज्ञा पत्रातील मजकूर आणि भारत सरकार आयुष मंत्रालय निमंत्रित सदस्य व शिवचरित्र व्याख्याते डॉ.शिवरत्नजी शेटे सर यांचे स्वाक्षरी प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

या स्पर्धेत सुमारे १२०० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रा.कल्याणराव वाकचौरे,प्रा.मकरंद कोऱ्हाळकर,गटशिक्षणाधिकारी पोपट काळे,शबाना शेख,प्रशासन अधिकारी मोहनिश तुंबारे,दत्तात्रेय गवळी,दिलीप तुपसैंदर,पांडुरंग शिंदे,अनिल अमृतकर,अतुल कोताडे,प्रविण निळकंठ,अमोल निर्मळ,किशोर भोसले,मतीन दारुवाला,सुवर्णा मठपती,अनुराधा सोनवणे सर्व सर्व शाळेचे व्यवस्थापन, मुख्याध्यापक,कलाशिक्षक,सहयोगी शिक्षक, कलाप्रेमींचे सहकार्य लाभले.स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांची चित्रे संकलित करून परिक्षण समितीकडे पाठविण्यात आली आहे.स्पर्धेचा निकाल व पारितोषिक वितरण संदर्भात शालेय स्तरावर कळविण्यात येईल.शिवजयंती उत्सवानिमित्त कोपरगावची परंपरा असलेली चित्रकला स्पर्धा निरंतर सुरू ठेवल्याबद्दल सूर्यतेज संस्था व आयोजकांचे कला प्रेमींकडून स्वागत केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close