सण-उत्सव
‘सूर्यतेज’ घर तेथे रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहिर
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अ.भा.मराठी नाट्य परिषद नगर जिल्हा शाखा व कोपरगाव तालुका,बाल रंगभूमी परिषद,फोटोग्राफर असोसिएशन,कलाध्यापक संघ,यांचेसह बारा विविध संस्था व दुकाने यांचे सहकार्याने याही वर्षी दीपावली-पाडवा निमित्त ‘घर तेथे रांगोळी’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचा निकाल नुकताचस्पर्धा समिती प्रमुख कल्पना गीते यांनी जाहीर केला आहे.यशस्वी विजेत्यांचे सर्वत्र अभिनंदर्न होत आहे.
रांगोळी स्पर्धेच्या पाच प्रकारात प्रथम क्रमांक विजेते परिक्षण समितीच्या शिफारसीनुसार पुढील वर्षापासून संयोजन समिती व परिक्षण सहाय्यक सदस्य म्हणून कामकाज पहातील.आणि प्रदर्शनार्थ रांगोळी साकारतील.सर्व बक्षिस विजेत्यांच्या सन्मानाची दिनांक,ठिकाण आणि वेळ हे आयोजकांकडून विजेत्यांना पत्र,मोबाईल द्वारे कळविण्यात येणार आहे-सुशांत घोडके,सूर्यतेज संस्था कोपरगाव.
या स्पर्धेसाठी पारंपारिक,निसर्गचित्र,व्यक्तीचित्र, सामाजिक विषय,व्यंगचित्र असे पाच विषय ठेवण्यात आले.पारंपरिक रांगोळी प्रकारात प्रथम क्रमांक (पैठणी,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) सरिता लाहोटी,विशेष गुणवत्ता रांगोळी (भेटवस्तू,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) ऐश्वर्या लोखंडे,रक्षा पांडे,भाविका केणे,सुनीता बिडवे,वृषाली खैरनार,पुष्पा गाडे,भाग्यश्री जोशी,शुभांगी राजगुरू,विद्या खर्डेकर,राजश्री भडकवाडे,ललिता गवारे,मंजुषा कुलथे,कमळा जंगम,श्रुती परजणे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
निसर्ग चित्र रांगोळी प्रकारात प्रथम क्रमांक शुभांगी अमृतकर (पैठणी,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) विशेष गुणवत्ता रांगोळी (भेटवस्तू,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) कोमल ठोंबरे,उन्नती आव्हाड,नम्रता मुंदडा,तपस्या इंगळे,आदिती केशरवानी,गायत्री सोनजे,मधुरा वाणी यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
व्यक्तिचित्र रांगोळी प्रकारात प्रथम क्रमांक प्राजक्ता राजेभोसले (पैठणी,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र), विशेष गुणवत्ता रांगोळी (भेटवस्तू,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) ऐश्वर्या वाकचौरे,गीताश्री राठोड,सौंदर्या बनसोड,सुवर्णा पहिलवान,तेजस्विनी कुंढारे,शिवानी देवरे,पायल भडकवाडे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
सामाजिक विषय रांगोळी प्रकारात प्रथम क्रमांक वैष्णव बिडवे (पैठणी,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र), विशेष गुणवत्ता रांगोळी (भेटवस्तू,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) प्रीती पगारे, निकिता निकम,आरती खेमनर,प्रीती दुसाने,आकांशा कुडके,मोनिका भडांगे,वैशाली वारे,तनुश्री वर्मा यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
व्यंगचित्र रांगोळी प्रकारात प्रथम क्रमांक गौरी चव्हाण (पैठणी,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र),विशेष गुणवत्ता रांगोळी (भेटवस्तू,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) आरती अरोडा,मधुमिता निळेकर,सायली पंजाबी यांना सन्मानित करण्यात येणार आहे.बक्षिस विजेत्यांचे सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके यांनी अभिनंदन केले आहे.