गुन्हे विषयक
कोळपेवाडीत महिलेचा विनयभंग,गुन्हा दाखल

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी ग्रामपंचायत हद्दीत मजुरी करणारीं एका महिला (वय-३१) आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास आपल्या लहान मुलीला घेऊन दवाखान्यात जात असता तिला एकटीला पाहून आरोपी अक्षय सुरेश शिंदे रा.कोळपेवाडी याने पाठलाग करून बाबासाहेब नाना कोळपे यांच्या शेताजवळ या महिलेचा विनयभंग केला असल्याची फिर्याद फिर्यादी महिलेने केल्याने कोळपेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी महिला तिची लहान मुलगी आजारी असल्याने व घरी ऐन वेळी कोणी घरी नसल्याने तिला उपचाराची गरज होती म्हणून तिला घेऊन दवाखान्यात आज दुपारी दोनच्या सुमारास चालली होती. तिला एकटी पाहून तिच्या पाठीमागून येऊन पाठलाग करून आरोपी अक्षय शिंदे याने रस्त्यात बाबासाहेब कोळपे यांच्या शेताजवळ अडवून तिचा हात धरून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”हि फिर्यादी महिला तिची लहान मुलगी आजारी असल्याने व घरी ऐन वेळी कोणी घरी नसल्याने तिला उपचाराची गरज होती म्हणून तिला घेऊन दवाखान्यात आज दुपारी दोनच्या सुमारास चालली होती. तिला एकटी पाहून तिच्या पाठीमागून येऊन पाठलाग करून आरोपी अक्षय शिंदे याने रस्त्यात बाबासाहेब कोळपे यांच्या शेताजवळ अडवून तिचा हात धरून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.अशी फिर्याद या महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.५४३/२०२० भा.द.वि.कलम ३५४ (अ),३५४ (ड),३४१ प्रमाणे आरोपी अक्षय शिंदे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एम.ए.कुसारे हे करीत आहेत.या घटनेने कोळपेवाडी परिसरात महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.