सण-उत्सव
…या गावी भैरवनाथ महाराज यात्रामहोत्सव उत्साहात संपन्न

न्युजसेवा
धामोरी-(दत्तात्रय घुले)
कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील ग्रामदैवत कालभैरवनाथ,वेताळ महाराज व हनुमान जयंती निमित्ताने यात्रा उत्सव करण्याचे आयोजन करण्यात आले होते.या यात्रा उत्सवकाळात भाविक भक्तांची मोठी गर्दी उसळली होती.

भैरवनाथ यात्रेनिमित्त ट्रॅक्टरला सजावट करून श्री काल भैरवनाथ व वेताळ महाराज प्रतिमेची मिरवणूक करून डीजेच्या तालावर भैरवनाथ मंदिर चौक,खंडेराव मंदिर चौक,मराठी शाळा परिसर अशा विविध भागातून भाविकांच्या उपस्थितीत काढण्यात आली होती.
सदर प्रसंगी भाविकांनी कालभैरवनाथांची मिरवणूक काढण्यात आली होती.यावेळी जयघोषाने परिसर दणाणून गेला होता.उत्सवात श्री कालभैरवनाथ मंदिर,श्रीराम मंदिर,श्री हनुमान मंदिरांवर नऊ दिवसांपासुन विद्युत रोषणाई करण्यात आली होती.त्याच बरोबर घटस्थापना ही करण्यात आली होती.
आज यात्रा समाप्ती निमित्ताने भैरवनाथ मंदिर परिसरात रहाट फेरी,मिठाई,खेळणी विक्रेत्यांनी दुकान गर्दिने भरून गेली होती.ट्रॅक्टरला सजावट करून श्री काल भैरवनाथ व वेताळ महाराज प्रतिमेची मिरवणूक करून डीजेच्या तालावर भैरवनाथ मंदिर चौक,खंडेराव मंदिर चौक,मराठी शाळा परिसर अशा विविध भागातून काढण्यात आली होती.तसेच या यात्रा उत्सवकाळात दिपाली पुणेकर ॲन्ड बाळासाहेब बेल्हेकर यांचा दोन दिवसासाठी लोकनाट्य तमाशाचे ही आयोजन करण्यात आले होते.

सदर यात्रोत्सव यशस्वीतेसाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष सतिष भाकरे,संपतराव भाकरे,राहुल वाणी,विलासराव भाकरे,दत्तात्रय पगार,पांडुरंग पगार,शिवाजीराव भाकरे,बाबासाहेब वाणी,सुनिलराव मांजरे,राजेंद्र आरगडे,नवयुवक मित्र मंडळ,भैरवनाथ मित्र मंडळांचे बंडुनाना भाकरे,संजय चिने,विद्युत रोषणाई डिपारमेंट ज्ञानेश्वर शिंदे,सार्थक जाधव,शिवाजी भाकरे,बाबासाहेब भाकरे,काकासाहेब वाघ,राघव जगताप,योगेश भाकरे,संजय भाकरे धामोरी येथील पोलीस पाटील सौ. संगीताताई विजयराव ताजणे तसेच धामोरी येथील ग्रामस्थ व परिसरातील भाविकांना मोठा सहभाग होता.