जाहिरात-9423439946
श्रीरामपूर तालुका

शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकरी संघटना अशोकच्या रणांगणात-अड.अजित काळे

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

श्रीरामपूर-(नानासाहेब जवरे)

शेतकरी संघटना शेतकरी हितासाठी अशोक सहकारी साखर कारखान्याच्या रणांगणात उतरली असून या लढाईत शेतकरी संघटनेचा विजय निश्चित मानला जात असून या लढाईत शेतकरी स्वयंस्फूर्तीने सहभागी होत असल्याचे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड.अजित काळे यांनी गोंधवणीत बोलताना केले आहे.

“अशोकच्या शेतकऱ्यांना उसाला रास्त भाव हा त्यांचा रास्त अधिकार आहे.व त्याच्या शेतमालाचे वजन करण्यापासून त्यांना कोणीही रोखू शकणार नाही अशी व्यवस्था अस्तित्वात आणणार आहे”-अड.अजित काळे,माजी अध्यक्ष,उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ,

श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण असलेल्या अशोक सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक येत्या रविवार दि.१६ जानेवारी रोजी संपन्न होत असून त्यासाठी सत्ताधारी मुरकुटे गटाच्या विरुद्ध शेतकरी संघटनेने औरंगाबाद खंडपीठ वकील संघाचे माजी अध्यक्ष तथा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली दंड थोपटले असून मोठे आव्हान निर्माण केले आहे.त्यामुळे प्रचार सभांना वेग आला आहे.त्यासाठी नुकतेच गोंधवणीत प्रचार बैठक आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अरुण पाटील लबडे हे होते.

सदर प्रसंगी श्रीरामपूरच्या नगराध्यक्ष अनुराधा आदिक,क्रांतिसिंह नानापाटील ब्रिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव नांदखिले,पुणे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे,प्रसिद्ध व्यवसायिक प्रमोद लबडे माजी नगरसेविका अर्चना पानसरे,आण्णा पाटील लबडे,राजेंद्र गवारे,वसंत लबडे,कैलास बोर्डे,शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे,शिवाजीराव शेजुळ,आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”सहकारी साखर कारखानदारी ही सभासदांना मालक बनविण्यासाठी राज्यात दाखल झाली बेलापूर या चळवळीच्या अग्रस्थानी होते.मात्र आज हेच बेलापूर आणि श्रीरामपूर तालुका राज्यातील साखर कारखानदारीत मागे पडला आहे.या तालुक्याला पुन्हा एकदा उर्जितावस्था आणण्यासाठी हि लढाई लढली जात आहे. आज वर्तमानात सभासदांना गुलाम बनवणारी यंत्रणा दुर्दैवाने अस्तित्वात आली आहे.त्यामुळे सभासदांना न्याय देण्यासाठी शेतकरी संघटना अशोक कारखान्याच्या निवडणुकीत उतरली असून शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय ही संघटना थांबणार नाही.अशोकच्या शेतकऱ्यांना उसाला रास्त भाव हा त्यांचा रास्त अधिकार आहे.व त्याच्या शेतमालाचे वजन करण्यापासून त्यांना कोणीही रोखू शकणार नाही अशी व्यवस्था अस्तित्वात आणणार आहे असे आश्वासनही त्यांनी शेवटी दिले आहे.

सदर प्रसंगी प्रास्तविक अनिल लबडे यांनी केले तर उपस्थितांना बाबासाहेब लबडे यांनी मार्गदर्शन केले आहे. सूत्रसंचलन राजेंद्र गवारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री फरगडे यांनी मानले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close