जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विशेष लेखमाला

कोपरगावसाठी ‘दारणा धरण समूह प्रकल्पात’ पाणी शिल्लक

जाहिरात-9423439946

कोपरगाव शहर पाण्याचा तमाशा भाग-५

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

आज आपण एकविसाव्या शतकात वावरत असलो तरी पाणी वापराच्या बाबतीत अठराव्या शतकातील पद्धतीच आग्रहपूर्वक अवलंब करीत आहोत.उपलब्ध पाण्यावर आपलीच मालकी असावी हि प्रस्थापितांनी मानसिकता अतिशय चुकीची व दुष्काळी जनतेवर अन्याय करणारी आहे.आता हेच पहाना कोपरगाव तालुका हा गोदावरी नदीच्या विपुल खोऱ्यात आहे.व या खोऱ्यातील जल निष्पत्ती नक्कीच प्रवरा खोऱ्यापेक्षा वीस टक्क्यांनी (म्हणजे ९५ टक्के) जास्त आहे.या बाबत गत भागात उहापोह झाला आहे.तरीही दारणा खोऱ्यात आता बिगर सिंचन पाणीच शिल्लक नाही असा जावई शोध कोपरगाव तालुक्यातील राजकिय नेत्यांसह माजी आमदारांनी लावला व आगामी कोपरगाव नगरपरिषद निवडणुका पाहून साप-साप म्हणून भुई बडविण्याचे काम जोरजोराने सुरु ठेवले आहे.व जेथे जागा व संधी मिळेल त्या ठिकाणी आपल्या निळवंडेच्या पिपाण्या वाजविण्याचे काम मनोभावे सुरु होते व आजही सुरू आहे.मात्र आता समाज सेवक अण्णा हजारे यांच्या कृपेने माहिती अधिकार हे मोठे अस्त्र-शस्र नागरिकांच्या हाती आले आहे.त्यामुळे यांच्या पिपाण्या नागरिक माहिती अधिकारात उघड करून जनतेत वस्तुस्थिती उघड करतील याची जराशी भीती या नेत्यांना वाटत नाही.

उलट हि माहिती उघड करणाऱ्या निळवंडे कालवा कृती समितीच्या कार्यकर्त्यांना उच्च न्यायालयात जाण्यासाठी कोणीतरी (आ.आशुतोष काळे यांचेकडे अंगुली निर्देश करून) मदत करून हे पाणी कोपरगाव शहरातील नागरिकांना नाकारले जात असल्याची कोल्हेकुई करून जनतेला संभ्रमात टाकण्याचे काम अव्याहतपणे सुरु आहे.आता हातात काहीच येत नाही हे ओळखून निळवंडे कालवा कृती समितीवर चिखलफेक करण्याचे काम या मंडळींनी सुरु केले आहे.याला काय म्हणावे ! हा आरोप करताना याचे भान या मंडळींना राहिले नाही की,”याच दुष्काळी कार्यकर्त्यांनी कधीकाळी माजी मंत्री कोल्हे यांच्या व पर्यायाने कोल्हेच्या कोल्हे कुटुंबाच्या पालख्या निळवंडेच्या पाण्याच्या अपेक्षेने या मंडळींनी वाहिल्या आहेत.व त्या वेळी झालेल्या निवडणुकात आरोप करणाऱ्या मंडळींचा एक छदाम कधी घेतलेला नाही.उलट झालेल्या प्रचार सभा व प्रचार फेऱ्यांना स्वतःच्या खिशाला झळ सोसून या मंडळींचे ओझी वाहिली असून त्यातूनच त्यांना विविध पदे राज्य पातळीवर मिळालेली आहे.याची जाणीव या मंडळींना राहिली नाही.हा आरोप करताना निदान ज्यांच्या नावाचा प्रेरणा स्र्रोत म्हणून उपयोग करतात ‘त्या’ माजी नेत्यांचा एकदा तरी सल्ला घायला हवा होता.मात्र त्यांना याची वर्तमानांत गरज राहिलेली नाही.कारण ज्या जेष्ठांचे नाव घेतात त्यानांच या मंडळींनी किंमत ठेवलेली आहे का ? हा खरा वर्तमानातील प्रश्न आहे. हे सांगायला कोण ज्योतिषाशी गरज उरलेली नाही.हे बोलायची इच्छा नसताना यांनी विनाकारण ‘मोहळावर दगड मारण्याचे’ पातक केले आहे.त्यामुळे नाईलाजाने हे समस्त कोपरगाववासीयांना हि बाब लक्षात आणून दयावी लागत आहे.कालवा कृती समिती पैशावर विकली असती तर तुम्हाला मंत्रालयात सन-२०१५ साली जलसंपदा मंत्र्याच्या कार्यालयाशेजारी असलेल्या स्वच्छता गृहांच्या बाहेर पती पत्नीला अर्धा तास याच कार्यकर्त्यांची वाट पाहायला लावली होती व वाट पाहूनही हाती काय आले होते हे जरा आठवले असते तर हे बोलायची हिंमत झाली नसती.पण ज्यांनी सर्व…सोडून दिली आहे त्यांच्या कडून वेगळी अपेक्षा ठेवणेच गैर आहे हेच खरे ! असो गोदावरी व दारणा धरण समूहात पाणी शिल्लक नाही हा त्याचा “निवडणूक कांगावा” आज येथे उघड करणे गरजेचे आहे.गोदावरी खोरे तुटीचे आहे.हे खरेच आहे.पण त्यात प्रवरा खोऱ्याचाही समावेश आहे.हे सांगणे गरजेचे आहे.शिवाय सरकारने दुष्काळी भागास पाणी देण्यासाठी निळवंडे धरण प्रस्तावित केले आहे.व नागपूर खंड पिठाच्या आदेशाने पाणी कोणी व कोठून घ्यावे यासाठी राज्य सरकारला धोरण घेण्यास दि.२० जुलै २०१९ च्या शासन आदेशाने भाग पाडले आहे.त्यात सहा ‘क’ मध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे.की,”विपुल खोऱ्यातून तुटीच्या खोऱ्यात पिण्यासाठी पाणी देता येते, मात्र “तुटीच्या खोऱ्यातून विपुल खोऱ्यात पिण्यासाठी पाणी देऊ नये” पुढे ६ ‘ड’ मध्ये तर,” दुष्काळी गावांना जर सिंचन प्रकल्पाचा फायदा होणार असेल तर हे पाणी मुळीच देऊ नये”असे शासन आदेश असतानाही कोपरगावला कृत्रिम पाणी टंचाई दाखवून हि मंडळी कोपरगावच्या महिलांचे नाव करून आपले पाप झाकू पाहत आहे.व आपल्या दारू कारखान्यांच्या पाण्याची सोय करत आहे.हे विशेष करून येथे नमूद केले पाहिजे.या शिवाय यांचे पाणी चोरीचे मामले याआधी नगराध्यक्ष यांनी सत्तेत आल्या आल्या उघड केलेले आहेच.त्याचा उहापोह येथे करणे गैर आहे.

अधीक्षक अभियंता औरंगाबाद यांना पाठवलेल्या पत्रात कार्यकारी अभियंता, नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभाग यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की,”उपरोक्त संदर्भीय विषयान्वये अनुसरून सविनय सादर करण्यात येते की,”मुख्याधिकारी कोपरगाव नगरपरिषद यांना संदर्भ क्रं.२ अन्वये कोपरगाव शहरासाठी एक्सप्रेस कॅनाल मधून पिण्यासाठी पाणी आरक्षणासाठी विहित नमुन्यातील प्रस्ताव जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या मार्फत सादर कारणेस्तव कळविलेले आहे.परंतु अद्याप त्यांच्याकडून सदरचा प्रस्ताव या विभागास प्राप्त झालेला नाही.तो प्राप्त होताच पुढील कार्यवाहीस्तव सादर करण्यात येईल”

आता कोपरगाव शहराला पाणी कुठून उपलब्ध होऊ शकेल हा कळीचा मुद्दा आहे.तर यासाठी नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभाग यांचे अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण औरंगाबाद यांना दि.०३ मे २०१७ रोजी जा.क्रं./नामपावि/सिंचन/०६८ हे सोबत प्रसिद्धीस दिलेले पत्र चिकित्सक वाचकांनी जरूर वाचावे.यात विषयच,”कोपरगाव शहरासाठी एक्सप्रेस कॅनाल मधून पिण्यासाठी पाणी आरक्षण मंजुरी” असा आहे.व यात तीन संदर्भ दिले असून खाली त्यात स्पष्टपणे म्हटले आहे की,”उपरोक्त संदर्भीय विषयान्वये अनुसरून सविनय सादर करण्यात येते की,”मुख्याधिकारी कोपरगाव नगरपरिषद यांना संदर्भ क्रं.२ अन्वये कोपरगाव शहरासाठी एक्सप्रेस कॅनाल मधून पिण्यासाठी पाणी आरक्षणासाठी विहित नमुन्यातील प्रस्ताव जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या मार्फत सादर कारणेस्तव कळविलेले आहे.परंतु अद्याप त्यांच्याकडून सदरचा प्रस्ताव या विभागास प्राप्त झालेला नाही.तो प्राप्त होताच पुढील कार्यवाहीस्तव सादर करण्यात येईल” व त्या खाली कार्यकारी अभियंता, नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभाग वैजापूर यांची सही आहे.त्या पत्रांच्या प्रति मुख्य अभियंता लाभक्षेत्र विकास जलसंपदा विभाग औरंगाबाद यांना व जिल्हाधिकारी नगर व मुख्याधिकारी कोपरगाव नगरपरिषद यांना माहितीस्तव पाठवली आहे.त्याचा पुरावा सोबत जोडला आहे.वाचकांनी अवश्य वाचावा.

या खेरीज अधीक्षक अभियंता यांनी मुख्यभियंता यांना पाठवलेला अहवाल ‘न्यूजसेवा पोर्टल’च्या हाती आला आहे.त्यात तत्कालीन अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांनी म्हटलं आहे की,”निळवंडे लाभक्षेत्रातील १८२ गावांनी शिर्डी कोपरगाव शहरांना पाणी देण्यास विरोध केलेला असताना सदर आरक्षण निळवंडे धरणातूनच का प्रस्तावित करण्यात आले आहे.किंवा इतर काही स्र्रोत उपलब्ध आहेत का याचा खुलासा करावा असे आदेश मुख्य अभियंता यांनी अधीक्षक अभियंता यांना दिलेला आहे.

कोपरगाव शहराला दारणा व गंगापूर समूहातील पाणी नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून निघणाऱ्या गोदावरी उजव्या तट कालव्यातून पाणी पुरवठा केला जातो.या प्राधिकरणांतर्गत बांधकामाधीन नांदूर मधमेश्वर प्रकल्प समुहातील वाकी व भाम या प्रकल्पांत अनुक्रमे सन-२०१७ व २०१८ मध्ये पूर्ण क्षमतेने पाणी साठा होणार असल्याने सद्यस्थितीत या प्रकल्पांवर कोणतेही बिगर सिंचन पाणी आरक्षण नाही.तरी या प्रकल्पावरील एकूण १४०.३६ दलघमी पाण्यापैकी १५ टक्के पिण्यासाठी गृहीत धरून २१.०५ द.ल.घ.मी. इतके पाणी उपलब्ध होऊ शकेल.

त्याला उत्तर देताना अधीक्षक अभियंता यांनी म्हटले आहे की,”सदर पाणी पुरवठा योजना निळवंडे धरण उद्भव धरून करण्यात यावा असे निर्देश मा.मुख्य अभियंता,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नाशिक यांना देण्यात आले होते.त्या नुसार मूळ प्रस्ताव तयार करण्यात आला होता.सदर प्रस्तावाची शेरेपूर्तता सुरु असताना दरम्यानच्या काळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे कडून शिर्डी संस्थानच्या ठरावानुसार कोपरगाव नगर परिषदेकरिता पाणी आरक्षण प्रस्तावाचा नव्याने अंतर्भाव केला गेला.तदनंतर दि.०१ ऑगष्ट २०१७ रोजी निळवंडे कालवा कृती समिती यांचे कडून प्राप्त पत्रानुसार लाभक्षेत्रातील १८२ ग्रामपंचायतींनी सदर पाणी आरक्षण निळवंडे धरण उद्भवातून करण्यास विरोध दर्शवला.

याबत शिर्डी संस्थान व कोपरगाव शहराला दारणा व गंगापूर समूहातील पाणी नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून निघणाऱ्या गोदावरी उजव्या तट कालव्यातून पाणी पुरवठा केला जातो.या प्राधिकरणांतर्गत बांधकामाधीन नांदूर मधमेश्वर प्रकल्प समुहातील वाकी व भाम या प्रकल्पांत अनुक्रमे सन-२०१७ व २०१८ मध्ये पूर्ण क्षमतेने पाणी साठा होणार असल्याने सद्यस्थितीत या प्रकल्पांवर कोणतेही बिगर सिंचन पाणी आरक्षण नाही.तरी या प्रकल्पावरील एकूण १४०.३६ दलघमी पाण्यापैकी १५ टक्के पिण्यासाठी गृहीत धरून २१.०५ द.ल.घ.मी. इतके पाणी उपलब्ध होऊ शकेल.असे स्पष्ट नमूद केले असतानाही निळवंडे वरून पाणी आरक्षणाचा बाल हट्ट का धरण्यात आला हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही इतके पुरे आहे.

क्रमशः

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close