विशेष दिन
…या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त सायकल वाटप उपक्रम संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राष्ट्रवादीचे खा.शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त सुरेगाव-कोळपेवाडी येथील रयत संकुलातील विद्यार्थ्यांना अल्प दरात दिल्या जाणाऱ्या सायकलचे आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात वाटप करण्यात आले आहे.
“लाखाच्या सभा भरल्या नसल्या ते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असतं.त्यांच्या पुढच्या कृतीचा अंदाज लावता लावता लोकं डोक्याचा भुगा करतात.आणि जीव ओवाळून टाकायचं म्हणाल,तर कायम स्वरूपी त्यांना निष्ठा बहाल करणारे निष्ठावंत कार्यकर्ते अवघ्या महाराष्ट्रभर त्यांनी निर्माण केले आहे त्या व्यक्तिमत्वाचे नाव म्हणजे खा.शरद पवार”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव विधानसभा मतदारसंघ.
बाळासाहेब ठाकरेंसारखं समोरच्यांना आपल्या कवेत घेईल अमोघ वक्तृत्व नाही,लाखा-लाखांच्या सभा त्यांच्या भरत नाहीत,शिव सैनिकांसारखे जीव ओवाळून टाकतो,असे म्हणणारे कार्यकर्ते नाहीत,ते कधीही कोणताही आदेश देत नाही पण तरीही शरद पवार या नावाचं गारूड या महाराष्ट्रभर का असावं.महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या माणसाला शरद पवार हे नाव माहित असतं.लाखाच्या सभा भरल्या नसल्या ते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असतं.त्यांच्या पुढच्या कृतीचा अंदाज लावता लावता लोकं डोक्याचा भुगा करतात.आणि जीव ओवाळून टाकायचं म्हणाल,तर कायम स्वरूपी त्यांना निष्ठा बहाल करणारे निष्ठावंत कार्यकर्ते अवघ्या महाराष्ट्रभर त्यांनी निर्माण केले आहे.खेडेगावातल्या एखाद्या कार्यकर्त्यापासून साहित्य,संस्कृती क्षेत्रातील मान्यवरांपर्यंत आणि स्वपक्षापासून विरोधी पक्षांपर्यंत पवारांच्या मैत्रीचं वर्तुळ विस्तारलेलं असतं.एखाद्या माणसाचे पैलू एवढे असू शकतात ? हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.त्या नेत्यांचा कोपरगाव येथे आ.काळे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
बारामती येथील उद्योजक आर.जे.सायकल व रयत बँकेच्या संचालक मंडळाच्या सहकार्यातून रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद्मभूषण खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ना-नफा,ना-तोटा या तत्वावर अल्प दरात दरात सायकल देण्यात आल्या आहेत.सुरेगाव-गौतमनगर येथील रयत संकुलातील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ट महाविद्यालय,तसेच राधाबाई काळे कन्या विद्यामंदिर व कनिष्ट महाविद्यालय व श्री छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालयातील विदायार्थ्यानी देखील अल्प दरात सायकल मिळावी यासाठी नावे पाठविण्यात आली होती.