जाहिरात-9423439946
विशेष दिन

अहिल्याबाई होळकर यांनी हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला-…यांचे प्रतिपादन 

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या.त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले,एवढचं नाही तर त्यानी प्रसिद्ध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला होता त्यात त्यांनी कोपरगाव शहरात गोदावरी तीरी दत्ताचा पार या ठिकाणी मोठा घाट बांधला होता.त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन कोपरगाव येथील प्रसिद्ध लेखा परीक्षक दत्तात्रय खेमनर यांनी नुकतेच कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“अहिल्यादेवी होळकर यांनी देशातील प्रसिद्ध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला या शिवाय नर्मदेच्या काठी असलेल्या महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले.त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या.त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले त्यामुळे त्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते”-दत्तात्रय खेमनर,लेखा परीक्षक,कोपरगाव.

  कोपरगाव शहरातील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने कोपरगाव शहरातील निवारा परिसरात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या २९९ व्या जयंती निमित्त लेखा परीक्षक दत्तात्रय खेमनर आणि धनगर समाजाचे नेते व कान्हेगावचे माजी सरपंच प्रकाश करडे यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर यांच्या तैलचित्राचे अनावरण मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.त्यावेळी ते बोलत होते.
   सदर प्रसंगी राज्य पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,राज्य धनगर सेवा संघाचे राज्य सचिव रमेश टिक्कल,ज्ञानेश्वर कोळपे,रावसाहेब करडे,भाऊसाहेब करडे,पांडुरंग करडे,अशोक मतकर,भाऊसाहेब बडे,रामदास आदमने,विठ्ठलराव  मैदड,साई निवारा मित्र मंडळाचे अध्यक्ष जनार्दन कदम,सदस्य,समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

   त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”त्यांनी देशातील प्रसिद्ध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला या शिवाय नर्मदेच्या काठी असलेल्या महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले.त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या.त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले.त्यांत द्वारका,काशी,उज्जैन,नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने उध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले.सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात.अहिल्याबाईंना प्रजेस कल्याणकारी असे काम करण्याची आवड होती.त्यामुळे आजही त्यांचे आदराने स्मरण केले जात असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.

   सदर प्रसंगी धनगर सेवा संघाचे राज्य सचिव रमेश टिक्कल यांनी प्रास्तविक केले त्यावेळी त्यांनी राज्य पतसंस्थेचेअध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या समता पतसंस्थेच्या कार्याची ओळख करून दिली आहे.तर कान्हेगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रकाश करडे यांनी मनोगतातून अहिल्याबाई होळकर यांच्या सामाजिक कार्याची ओळख करून दिली आहे.सदर कार्यक्रमास निवारा परिसरातील साई निवारा मित्र मंडळाचे सहकार्य लाभले होते.
   सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनार्दन कदम यांनी केले तर उपस्थितांचे आभार समता पतसंस्था कोपरगाव शाखेचे शाखाधिकारी योगेश मोरे यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close