विशेष दिन
…या संस्थेच्या वतीने शिवजयंती उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थेच्या वतीने स्वराज्य संथापाक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ व्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.त्या निमित्ताने प्रतिमा,शिरस्राण,पुजन कोपरगांवचे लोककलाकार वासुदेव छबुराव सुपेकर यांचे शुभहस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले होते.

महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड येथील समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्व प्रथम प्रदीर्घ पोवाडा लिहिला.रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीची व्यवस्था सरकारने स्वतःकडे घ्यावी असा अर्ज ज्योतिबांनी केला होता.१८७० साली महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली “शिवजयंती ” साजरी केली होती.
शिव जयंती सुरुवात सन-१८६९ साली महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड येथील समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्व प्रथम प्रदीर्घ पोवाडा लिहिला.रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीची व्यवस्था सरकारने स्वतःकडे घ्यावी असा अर्ज ज्योतिबांनी केला होता.१८७० साली महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली “शिवजयंती ” साजरी केली.त्यानंतर १८९५ मधे लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला.जनतेने एकत्र येऊन अशा उत्सवांच्या निमित्ताने राष्ट्रप्रेम जागवावं आणि त्याचा वापर ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी करावा असा हेतू यामागे होता.सुरुवातीच्या काळात शिवजयंती फक्त महाराष्ट्रात साजरी होत होती.आता ती कोपरगावसह जगभर जाऊन पोहचली आहे.
या प्रसंगी संत रामदासी बाबा भक्त मंडळाचे सदस्य शरद थोरात,महाराष्ट्र शासन शिवछत्रपती पुरस्कार विजेते दिलीप घोडके,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाह निलेश जाधव,सूर्यतेज संस्थापक,व वनश्री पुरस्कार विजेते सुशांत घोडके,व्यवस्था प्रमुख प्रमोद जावरे,राजेंद्र शिंगाडे,संदिप शिंदे,आर्यन जाधव यांचेसह शिवप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.