विशेष दिन
…या पोलीस ठाण्यात आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव शहर पोलीस ठाण्यात आज आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला आहे.योग मार्गदर्शक अनिल अमृतकर यांनी योग साधनाविषयी माहिती सांगत योगासनाचे प्राथमिक प्रकार सादर केले.योग प्रात्यक्षिककार ओंकार कोळपकर यांनी शिर्षासन,वृक्षासन मयुरासन,व्याघ्रासन,हनुमानासन,पूर्णचक्रासन या सारखी योगासन प्रात्यक्षिक करुन दाखवत त्याचे शारीरिक फायदे विशद केले आहे.
दि.२१ जून हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो.योग ही भारताने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे.संपूर्ण जगभरात योग दिन साजरा व्हावा यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रस्ताव मांडला होता त्यास त्यांनी मंजुरी दिली असून आता कोपरगावसह हा दिन जगभर साजरा करण्यात येत आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.पोलीस निरीक्षक रामराव ढिकले,सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी योग दिन कार्यक्रमाचे संयोजन केले.
पोलीस हवालदार डी.आर.तिकोणे,पोलीस नाईक दिगंबर शेलार,लिंबोरे,गणेश काकडे,तमनर,कु-हाडे, धोंगडे,गोपनिय शाखेचे राम खारतोडे,होमगार्ड प्रमोद येवले यांचे सह कोपरगांव शहर पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले आहे.