जाहिरात-9423439946
विधी व न्याय विभाग

कोपरगावात ‘राष्ट्रीय लोकअदालती’त मोठ्या प्रमाणात प्रकरणाचा निपटारा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव न्यायालयात नुकतीच “राष्ट्रीयलोक अदालत” जिल्हा न्यायाधीश श्री कोऱ्हाळे व एम.एस.बोधनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली असून यात दिवसभरात ०५ हजार ३०० प्रकरणाचा निपटारा करण्यात आला असून दाखलपूर्व ०३.९० कोटी रुपयांचा वसूल करण्यात आला असून हा आकडा जिल्ह्यात सर्वाधिक असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीस सरकारी अभियोक्ता अशोक वहाडणे यांनी दिली आहे.त्यामुळे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मागील लोक अदालतीमध्ये जनतेचा भरघोस प्रतिसाद लाभला बँकांनीही कर्ज प्रकरणात मोठ्या प्रमाणात सूट दिल्याने काही कोटी रूपयांची कर्ज वसूली झाली आहे.त्याच अनुषंगाने बँका,पतसंस्था,भारत संचार निगम व महावितरण यांनी मोठा उत्साह दाखविला आहे.मात्र या गर्दीत कोरोना नियमांचा फज्जा उडालेला दिसून आला आहे.यात कोरोना साथीचा प्रसार न झाला म्हणजे तालुका प्रशासनने कमावली याबाबत आयोजकांनी मोठी जोखीम पत्करल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,नवी दिल्ली व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या सूचनेनुसार आयोजित या राष्ट्रीय लोक अदालतीत दाखलपूर्व आणि प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात येणार होती.ह्या लोकअदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे,त्यानुसार आज न्यायालयीन आवारात मोठी गर्दी आढळून आली आहे.

या लोकअदालतीमध्ये बँका,पतसंस्था,महावितरण कंपनी,भारत संचार निगम,नगरपंचायत,ग्रामपंचायत यांची रक्कम वसूली व करवसुलीचे प्रकरणे तसेच दिवाणी,फौजदारी,एन.आय.ॲक्टची प्रकरणे,कामगार कायदयाखालील प्रकरणे,कौटुंबिक वादांची प्रकरणे तसेच न्यायालयात येण्या अगोदरचे दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती.पक्षकारांनी ही प्रकरणे परस्पर सामंजस्याने निकाली काढावेत असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले होते.त्यासाठी एकूण आठ न्यायिक पीठे नेमण्यात आली होती.त्यात सर्व जिल्हा व तालुका स्तरीय न्यायालये,तहसीलदार,मुख्याधिकारी,ग्रामविकास अधिकारी,वकील आदींचा समावेश होता.

सदर प्रसंगी जिल्हा न्यायाधीश श्री कोऱ्हाळे, एम.एस.बोधनकर,दिवाणी न्यायाधीश सचदेव मॅडम,श्री मिसाळ,श्री पांचाळ,श्री डोईफोडे,श्री शेख,श्री सय्यद,सरकारी वकील अशोक वाहाडणे,अड्.अशोक टुपके, अड्.वाबळे,वकील संघाचे अध्यक्ष शिरिषकुमार लोहकणे,माजी अध्यक्ष अड्.जयंत जोशी,अड्.शंतनू धोर्डे,अड्.भास्कर गंगावणे,महिला अड्.सौ.देशमुख,सौ.गायकवाड,नामदेवराव परजणे विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी,कोपरगाव,राहाता तालुक्यातील पक्षकार आदी बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान या ठिकाणी कोपरगांव शहरातील थकीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी धारकाची वसुली प्रकरणाची तडजोडी करणेची मोहीम राबविण्यात आली. यामध्ये सुमारे ६०० कर धारकानी आपल्या थकीत कराचा भरणा केलेला आहे.यामध्ये एकुण रक्कम रु.२९ लाख ६६ हजार ८२७ रुपये कराची रक्कम सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत वसुल झालेली आहे.सदर मोहिमेस कोपरगांव नगरपरिषद कार्यालयात सकाळी १० वाजेपासुन सुरुवात करण्यात आली होती. याकरिता कार्यालयात नागरिकांच्या सोयीकरिता एकुण ०७ रोख तगादा टेबल लावण्यात आलेले होते.

दरम्यान तालुक्यातील महावितरण कंपनीचे अधिकाऱ्यांनी या ठिकाणी ठाण मांडले होते त्यात त्यांनी ५४८ प्रकरणे दाखल होते.पैकी केवळ १० प्रकरणे मिटली आहेत.यातील बहुदा आधीच ती मिटली असल्याचे बोलले जात आहे.त्यात देखावा अधिक व काम कमी अशी स्थिती होती.पुढील आकडेवारी तरी तेच सांगत असल्याचे दिसून आले आहे.पंचायत समिती व नगरपरिषदेने एकूण ७ हजार ७४१ प्रकरणे दाखल केली होती.त्यातील ३ हजार ३५७ निकाली निघाली असून त्यातून ९४ लाख ३२ हजार ४६८ रुपयांची वसुली झाली आहे.तर न्यायालयीन विभागाची ०१ हजार ६७६ प्रकरणे दाखल झाली होती त्यातील केवळ २५५ प्रकरणे निकाली निघाली आहे.त्यातून ०२ कोटी ६८ लाख ५ हजार १३० रुपये वसूल झाले आहे.यात कोरोना कालखंडातील कलम १८८ ची प्रकरणे अधिक असल्याचे बोलले जात आहे.या शिवाय वित्तीय संस्था त्यात बँका व पतसंस्था असून त्यांची ०१ हजार २८३ प्रकरणे दाखल करण्यात आली होती.त्यातील ४१ प्रकरणे तडजोड करून मिटवली असून त्यातून २७ लाख ०३ हजार ३०० रुपये वसूल झाले आहे.सहकार विभागातील ६० प्रकरणे दाखल होती त्यातील केवळ ०७ प्रकरणे मिटवून त्यातून ३३ लाख २२ हजार ०५० रुपये वसूल झाले आहे.या शिवाय महावितरण कंपनीची एकूण ५४८ प्रकरणे दाखल करण्यात आलेली होती त्यातील केवळ १० प्रकरणे मिटली आहे.व त्यातून ६२ हजार ०२० रुपयांची नाममात्र वसुली झाली आहे.तीच अवस्था भारत संचार निगम कंपनीची असून त्यांनी ३३५ प्रकरणे दाखल केली होती त्यातील तडजोडी अंती १२ प्रकरणे मिटली आहे.व त्यातून केवळ ०८ हजार ९८० रुपयांची नाममात्र वसुली झाली आहे.यास अड्.अशोक टुपके यांनी दुजोरा दिला आहे.दरम्यान विविध सरकारी भूसंपादनाची २३ प्रकरणे मिटली त्यातून अंदाजे एक कोटी रुपयांहून अधिक भरपाई शेतकऱ्यांना आगामी काळात मिळणार आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close