जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विधी व न्याय विभाग

कोपरगाव नगरपरिषद अधिकारी मारहाण प्रकरणी..’त्या’आरोपिंना अखेर जामीन !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगांव प्रतिनिधी- दि.२२ जुलै रोजी कोपरगाव नगरपरिषदेच्या कार्यालयात येऊन बांधकाम विभागात तोडफोड करण्यात येऊन उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांना मारहाण करण्याचा प्रकारातील शिवसेनेच्या गटनेत्यासह सात आरोपीना तब्बल तेरा दिवसांनी कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एम.एस.बोधनकर यांनी प्रत्येकी १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला असल्याची माहिती जिल्हा सरकारी वकिलांनी दिली आहे.सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी एवढे दिवस कारागृहात राहण्याची हि दुर्मिळ घटना मानली जात आहे.

संबंधित सात आरोपींना अटक केल्यावर काही प्रमुख आरोपींनीं आपण आजारी असल्याचा बनाव केला होता.तो विरोधी गट सजग असल्याने उघड झाला होता.व त्यावर तीव्र प्रतिक्रिया आल्या होत्या.या आरोपींना कोपरगाव ग्रामीण आरोग्य विभागाने तातडीने नगर येथे सिव्हिल हॉस्पिटल येथे रवानगी केली होती.त्यावर ग्रामीण रुग्णालयाचा आरोग्य विभाग प्रखर टीकेचा धनी झाला होता.व त्याचा उलट परिणाम झाला असल्याचे शहर वर्तुळात बोलले जात आहे.

कोपरगाव नगर परिषदेत गत महिन्यात दि.२२ जुलै रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहरातील पूनम चित्रपट गृहासमोरील आरोपींचे अवैध टपरीचे अतिक्रमण रात्रीच्या सुमारास नगरपरिषदेने काढल्याचा राग मनांत धरून शिवनेनेचे माजी शहराध्यक्ष सनी वाघ,माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान गटनेते योगेश बागुल,उपजिल्हा प्रमुख कैलास जाधव,बालाजी गोर्डे,साई गोर्डे,निलेश गोर्डे,आशिष शेळके आदीनीं बेकायदा जमाव करून कोपरगाव नगरपरिषदेत जाऊन अधिकाऱ्यांना मारहाण,शिवीगाळ करून कार्यालयातील वस्तूंची तोडफोड केल्या प्रकरणी उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दखल केला होता.त्याचे मोठे पडसाद उमटले होते.दुसऱ्या दिवशी आरोपींनी आपल्या गुन्ह्याच्या समर्थनार्थ छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे भांडवल केले होते.मात्र उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांनी आपण या अतिक्रमण मोहिमेचे पोलिसांसमक्ष चित्रीकरण केले असल्याचे सांगून असा कोणताही प्रकार नसल्याचे उघड करून या आरोपीना उघडे पाडले होते.त्या नंतर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनीही या प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन प्रखर टीका केली होती.तर कोपरगाव नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांनी कामबंद आंदोलनाची हाक दिली होती व नगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांना नगरपरिषद संघटनेने राज्यभर आंदोलन करून हा प्रश्न प्रतिष्ठेचा केला होता.तर कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी या प्रकरणी निषेध करून नगर परिषद प्रशासन यांची जाहीर दिलगिरी व्यक्त केली होती.मात्र या प्रकरणावर मात्र भाजप कोल्हे गटाने एकदम गुपचिळी घेतली होती.त्या नंतर अद्याप या आरोपीना जामीन मिळाला नव्हता.
आरोपींना अटक केल्यावर काही प्रमुख आरोपींनीं आपण आजारी असल्याचा बनाव केला होता.तो विरोधी गट सजग असल्याने उघड झाला होता.व त्यावर तीव्र प्रतिक्रिया आल्या होत्या.या आरोपींना कोपरगाव ग्रामीण आरोग्य विभागाने तातडीने नगर येथे सिव्हिल हॉस्पिटल येथे रवानगी केली होती.त्यावर ग्रामीण रुग्णालयाचा आरोग्य विभाग प्रखर टीकेचा धनी झाला होता.व त्याचा उलट परिणाम झाला असल्याचे शहर वर्तुळात बोलले जात आहे.आरोपींनीं या जामिनासाठी वरिष्ठ न्यायालयात अपील न केल्याने त्यांना कारागृहात आपला वेळ व्यतीत करावा लागला असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान त्यावर आज कोपरगाव जिल्हा व सत्र न्यायालयात सूनावणी होऊन आज न्या. एम.एस.बोधनकर यांनी सातही आरोपीना तब्बल तेरा दिवसांनी प्रत्येकी पंधरा हजारांचा जामीन मंजूर केला असल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील यांनी दिली आहे.सरकारी पक्षाच्या वतीने अड्.शरद गुजर यांनी तर आरोपींच्या वतीने अड्.जयंत जोशी यांनी काम पाहिले आहे.त्यांना अड्.व्ही.पी.ख्रिस्ते व अड्.वैभव बागुल यांनी सहाय्य केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close