जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

कोपरगाव लोक न्यायालयात…इतके खटले निकाली

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव न्यायालयात नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून एका दिवसात १२ हजार ७९६ पैकी ०२ हजार ८१६ खटले निकाली निघाले असून तडजोडीत ५ कोटी ४८ लक्ष ३७ हजार ३८८ रुपयांची वसुली झाली असल्याची माहिती सरकारी अभियोक्ता अशोक वहाडणे यांनी दिली आहे.या माध्यमातून कोपरगांव न्यायालयाचा जिल्ह्यात दुसरा क्रमांक आला असल्याची माहितीआहे.

कोपरगाव येथील लोकन्यायालयात दाखलपूर्व व दाखल असे दोन्ही प्रकारची १२ हजार ७९६ प्रकरणे प्रलंबित होती त्या पैकी न्यायालयासमोर ०६ हजार ८८९ प्रकरणे ठेवण्यात आली होती.यामध्ये दाखलपूर्व ०४ हजार ७३० प्रकरणांपैकी ०२ हजार ६३४ प्रकरणे निकाली काढत ०१ कोटी २६ लाख ४५ हजार ३९० रूपयांची वसूली करण्यात आली.दाखल ०६ हजार ८८९ प्रकरणांपैकी ०२ हजार ८१६ प्रकरणे निकाली काढत ०५ कोटी ४८ लाख ३७ हजार ३८८ रूपयांची वसूली करण्यात आली आहे.

कोपरगाव तालुका विधी सेवा प्राधिकरण समिती व कोपरगाव वकील संघ यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोक न्यायालयाचे नुकतेच आयोजन कोपरगाव न्यायालयात करण्यात आले होते.या लोकन्यायालयात दाखलपूर्व व दाखल असे दोन्ही प्रकारची १२ हजार ७९६ प्रकरणे ठेवण्यात आली होती.यामध्ये दाखलपूर्व ०४ हजार ७३० प्रकरणांपैकी ०२ हजार ६३४ प्रकरणे निकाली काढत ०१ कोटी २६ लाख ४५ हजार ३९० रूपयांची वसूली करण्यात आली.त्यात लोकन्यायालयात १२ हजार ७९६ पैकी सुनावणीस ०६ हजार ८८९ प्रकरणे ठेवण्यात आली होती.या प्रकरणांपैकी ०२ हजार ८१६ प्रकरणे निकाली काढत ०५ कोटी ४८ लाख ३७ हजार ३८८ रूपयांची वसूली करण्यात आली आहे.

दरम्यान यात ग्रामपंचायतींची घरपट्टी,पाणीपट्टी तत्सम ०२ हजार ५९६ खटले निकाली काढण्यात आले आहे.त्यातून ४४ लाख ६६ हजार १९६ रुपयांची वसुली करण्यात आली आहे.तर विविध वित्तीय संस्था तथा बँकांचे २८ खटले निकाली काढण्यात आले आहे.त्यातून संबंधित बँकांनी ६९ लाख ०५ हजार २९१ रुपयांची वसुली केली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

दरम्यान या लोकन्यायालयात जमिनीबाबत १० प्रकरणे सुनावणीस ठेवली होती.ती निकाली निघाली असून त्यातून १२ लाख ७३ हजार ९०३ रुपयांची वसुली करण्यात आलेली आहे.याशिवाय विज बिलाबाबत ०४ प्रकरणे निकाली निघाली असून त्यातून महावितरण कंपनीस १८ हजार ४६० रुपयांची नीचांकी वसुली झाली आहे.तर मोटार अपघात प्रकरणात ०३ प्रकरणातील ३८ लाख ९६ हजार रुपयांची वसुली झाली आहे.तर धनादेश न वटल्या प्रकरणी ५६ प्रकरणे समोर ठेवण्यात आली होती.त्यातून ०१ कोटी ९५ लाख ८९ हजार ६९९ रुपयांची वसुली करण्यात आलेली आहे.तर २१ गुन्हेगारी प्रकरणातील ६९ लाख ०५ हजार २९१ रुपयांची वसुली करण्यात आली आहे.तर ३९ दिवाणी दाव्यात ०१ कोटी १७ लाख ७१ हजार ५४८ रुपयांची वसुली झाली आहे.तर अन्य ४५ दाव्यात ११ हजार रुपयांची अशी एकूण ०२ हजार ८१६ प्रकरणातील ०५ कोटी ४८ लाख ३७ हजार ३८८ रुपयांची विक्रमी वसुली झाली असली तरी यावेळेला मात्र जिल्ह्यात सर्वाधिक दावे निकाली काढण्याचा व महसूल वसूल करण्याचा पहिला क्रमांक मात्र दुर्दैवाने हुकला आहे.यात श्रीगोंदा लोक न्यायालयाने बाजी मारलेली दिसून आली आहे.

या प्रसंगी कोपरगांव जिल्हा न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश-१ व तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष सयाजीराव को-हाळे,जिल्हा न्यायाधीश-२ भुजंगराव पाटील,दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठस्तर) शौकत देसाई,सहदिवाणी न्यायाधीश स्वरुप बोस,सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठस्तर-२) महेश शिलार, सहदिवाणी न्यायाधीश (वरिष्ठस्तर-३) भगवान पंडित,दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठस्तर) स्मिता बनसोड,सहकार न्यायाधिश ल.मू.सय्यद,कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष शिवाजी खामकर,कोपरगाव जिल्हा सरकारी वकील ॲड.अशोक वहाडणे,कोपरगाव जिल्हा सहाय्यक सरकारी वकील शरद गुजर,सहाय्यक सरकारी वकील अशोक टुपके,मनोहर येवले,महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष तथा राज्याचे सचिव बंडू बडे,सागर नगरकर,अधीक्षक काकडे,न्यायालयीन कर्मचारी शाहिद शेख,अशोक दहिफळे,सुरज माळवदे,सागर गुरसाळे,राहूल बेडके,प्रसाद भगत,श्री भास्कर,आदींनी योगदान दिले आहे.यांचे सह लोकन्यायालयात दाखल केलेल्या विविध खटल्यांचे पक्षकार,वकील,संबंधित खात्यांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close