जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
महसूल विभाग

सेवा पंधरवड्यात…या महसूल उपविभागात २१ हजार ८८४ प्रकरणे मार्गी !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

शिर्डी-(उमाका वृत्तसेवा)

सेवा पंधरवड्यात शिर्डी महसूल उपविभागाने उल्लेखनीय कामगिरी करत २१ हजार ८८४ प्रकरणांचा निपटारा केला आहे.विशेष म्हणजे राहाता तहसीलने दोन दिवसातच विशेष सहाय्य योजनेच्या ३ हजार लाभार्थ्यांना थेट गावात जाऊन हयातीचे दाखले दिले आहेत.महसूल विभागाच्या सकारात्मक पावलांमुळे सेवा पंधरवडा सर्वसामान्यांसाठी लाभदायी ठरला आहे.

‘‘सेवा पंधरवड्यात महसूल विभागाशी संबंधित व तालुका प्रशासनाची निगडीत विविध लोकोपयोगी कामांचा जलद निपटारा करण्यास प्राधान्ये देण्यात आले. हयातीचे दाखले वितरणाची विशेष मोहीम राबविण्यात आली. सर्वसामान्य नागरिकांची प्राप्त प्रकरणे रोजच निपटारा करण्यावर प्रशासनाचा भर आहे. यापुढे ही नागरिकांना लोकाभिमुख व जलद सेवा देण्यावर भर राहील”-गोविंद शिंदे,शिर्डी उपविभागीय अधिकारी.

सर्वसामान्यांच्या तक्रारींचा निपटारा व्हावा यासाठी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला होता.कासाचे विविध उपक्रम राबवण्यासोबत प्रशासन जनतेचे प्रश्न (तक्रारी) निकाली काढण्यासाठी प्रयत्नशील असते.पण अनेक प्रकरणात काही कारणामुळे किंवा काही शुल्लक चुकांमुळे प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित असतात;नियमित प्रक्रियेत मागे पडतात.यामुळे संबंधिताना व्यवहारात अडचणी येऊ शकतात,अशी प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी सेवा पंधरवड्याचा शिर्डी महसूल उपविभागाने पुरेपूर उपयोग करून घेतला.

या पंधरवड्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नवीन शासन निर्णयानुसार मदत, पंतप्रधान किसान सन्मान निधी, प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा,महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ अन्वये अर्ज,शेतरस्ते,तुकडेजोड व तुकडेबंदी नियमितीकरण, वय,राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र,जातीचे प्रमाणपत्र,उत्पन्न प्रमाणपत्र,नॉन क्रिमीलेअर, तात्पुरता रहिवास दाखला, सांस्कृतिक कार्यक्रम परवाना, अधिकार अभिलेखची प्रमाणित प्रत, अल्पभूधारक दाखला,शेतकरी असल्याचा दाखला,डोंगर,दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचा दाखला, आदिवासी दाखला,प्रतिज्ञापत्र साक्षांकित करणे आदी प्रकरणांचा प्राधान्याने निपटारा करण्यात आला.

‘‘कोपरगांव तहसीलस्तरावर प्राप्त प्रकरणांचा दैंनदिन निपटारा करण्यात येत असतो.त्यामुळे प्रकरणे प्रलंबित राहत नाहीत.कोपरगांव तालुक्यात वय,राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र,जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर या शैक्षणिक कागदपत्रांचा प्राधान्याने तत्परपणे निपटारा केल्यामुळे लाभार्थी विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.शासनाची सकारात्मक प्रतिमा निर्माण झाली आहे’’-विजय बोरुडे,तहसीलदार,कोपरगाव.

शिर्डीचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या गेलेल्या या मोहीमेत राहाता तहसीलमध्ये ८४६२ प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात आली. कोपरगांव तहसीलमध्ये १३४२२ प्रकरणे निकाली काढून मार्गी लावण्यात आली आहे.

‘‘सेवा पंधरवड्यात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आदेशानुसार विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांचे हयातीचे दाखले थेट गावातच उपलब्ध करून देण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली.या मोहीमेत दोन दिवसातच तहसीलयंत्रणेच्या सांघिक मेहनतीमुळे ३ हजार हयातीचे दाखले ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिले.विशेष मोहीम १ हजार २६५ लाभार्थ्याना आदिवासी दाखले वितरित करण्यात आले. राहाता तहसीलच्या कामगिरीमुळे लाभर्थ्यांना सुखद धक्का बसला. लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटून गेले ’’अशी प्रतिक्रिया तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close