जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
महसूल विभाग

महसूल अधिकाऱ्यांना..येथे जात पडताळणीबाबत प्रशिक्षण संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
अ.नगर-(प्रतिनिधी)

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने जिल्ह्यातील महसूल विभागाच्या उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना जात प्रमाणपत्र देतांना घ्यावयाची दक्षता व त्यातील महत्वाच्या बाबी यासंदर्भात आज ऑनलाईन प्रशिक्षण दिले.महाविद्यालयाच्या प्राचार्य व कर्मचाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी बाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.समितीचे अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) विकास मारुती पानसरे यांनी अधिकाऱ्यांना व प्राचार्यांना मार्गदर्शन केले आहे.

“जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी या दोन्ही प्रक्रीया साध्या व सरळ आहेत.अर्जदारांच्या मनात या प्रक्रियेविषयी संभ्रम निर्माण न करता त्यांना योग्य मार्गदर्शन करणे प्रशासनातील लोकांचे आहे.योग्य पुरावे असलेल्या मोजक्या कागदपत्रांच्या आधारावर जातवैधता प्रमाणपत्र उमेदवारांना तत्परतेने देणे शक्य आहे”-विकास पानसरे,अप्पर जिल्हाधिकारी.अ.नगर.

समितीचे सदस्य तथा उपायुक्त अमीना शेख,सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी भागवत खरे यांनी ही जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्राबाबत माहिती दिली.यात जात प्रमाणपत्र देतांना काय दक्षता घ्यावी. कोणत्या कागदपत्रांच्या आधारे प्रमाणपत्र द्यावेत.आदींबाबतची माहिती देण्यात आली.

समितीचे अध्यक्ष विकास पानसरे यांनी जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज कसे भरावेत ? त्यासोबत कोणती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे ? शाळा,महाविद्यालय यांनी कोणती उपाययोजना करणे आवश्यक आहे ? विद्यार्थ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव कशा प्रकारे सादर करावेत? ऑनलाइन अर्जांचा भरणा कसा करावा ? त्यानंतर काय प्रक्रिया अंवलबिण्यात यावी.या विषयांवर उपस्थित प्राचार्य व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले आहे.

“जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी या दोन्ही प्रक्रीया साध्या व सरळ आहेत.अर्जदारांच्या मनात या प्रक्रियेविषयी संभ्रम निर्माण न करता त्यांना योग्य मार्गदर्शन करणे प्रशासनातील लोकांचे आहे.योग्य पुरावे असलेल्या मोजक्या कागदपत्रांच्या आधारावर जातवैधता प्रमाणपत्र उमेदवारांना तत्परतेने देणे शक्य आहे.असेही श्री.पानसरे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सहभागी अधिकारी व प्राचार्यांंच्या जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी विषयी असलेल्या शंकांचं ‌समाधान ही जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close