जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
महसूल विभाग

कोपरगाव तहसील कार्यालयात ‘महा-फेरफार अदालत’ संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात सप्टेंबर अखेर १ हजार ०८३ फेरफार प्रलंबित होते.त्यातील आज झालेल्या महा-फेरफार अदालतीत जवळपास ७०० निकाली काढले असल्याची माहिती कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

“आज आयोजित केलेल्या महा-अदालतीत संजय गांधी निराधार योजना,इंदिरा गांधी,निवडणूक आयोगाची मतदार यादीतील नवे समाविष्ट करणे,काम करणे,ई पीक पाहणी जनजागृती,अतिवृष्टी नुकसान पंचनामे,याद्या दुरुस्ती करणे आदी योजनेच्या लाभार्थ्यांच्या समस्या निवारण केले आहे.कोपरगाव तालुक्यात सप्टेंबर अखेर १ हजार ०८३ फेरफार प्रलंबित होते.त्यातील आज झालेल्या फेरफार अदालतीत जवळपास ७०० निकाली काढले आहे”-विजय बोरुडे,तहसीलदार,कोपरगाव.

महाराष्ट्र शासनाने नागरिकांना सेवेचा हक्क देणारा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ हा क्रांतीकारी कायदा केला असून त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे.या कायद्यान्वये राज्याच्या नागरिकांना पारदर्शक,गतिमान व कालबध्द सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.या कायद्याअंतर्गत ज्या सेवा नागरिकांना प्राप्त करून घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे याची माहिती ‘आरटीएस महाराष्ट्र’ मोबाईल ॲप व https://aaplesarkar.mahaonline.gov.in या पोर्टलवर पाहता येते.या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.त्याअंतर्गत सर्व सामान्य जनतेची कामे विहीत कालावधीत व्हावीत या करीता राज्य शासनाने सन-२०१५ मध्ये “आपले सरकार सेवा” पोर्टल सुरु केले असून जनतेची कामे विहीत कालमर्यादेत पूर्ण होणे अपेक्षित आहे.शासन स्तरावर निमितपणे पोर्टलचा आढावा घेतला जातो.तसेच मंत्रालय स्तरावर नागरिकांकडुन प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे अवलोकन केले असता अनेक प्रकरणी नागरिकांचे अर्ज,तक्रारी यांचा सक्षम प्राधिकारी यांचेकडून विहीत कालमर्यादेमध्ये निपटारा होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांचे प्रलंबित अर्ज,तक्रारी यांचा निपटारा व्हावा यासाठी राज्यात १७ सप्टेंबर २०२२ ते ०२ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत “सेवा पंधरवडा” राबविण्याचे शासनाने निश्चित केले आहे.त्याअंतर्गत आज कोपरगाव तहसिल कार्यालायत आज सकाळी ११ ते सायंकाळी ५.४५ वाजे पर्यंत महा फेरफार अदालत आयोजित करण्यात अदालत होती.त्यात हा निपटारा केला आहे.

सदर प्रसंगी तहसीलदार विजय बोरुडे,तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे,महसूल अव्वल कारकून चंद्रशेखर कुलथे,योगेश पालवे,मंडलाधिकारी बाळासाहेब साबळे,गोसावी आदिसंह तालुक्यातील सर्व मंडलाधिकारी,कृषी सहाय्यक,तलाठी,ग्रामसेवक उपस्थित होते.

सदर प्रसंगी संजय गांधी निराधार योजना,इंदिरा गांधी,निवडणूक आयोगाची मतदार यादीतील नवे समाविष्ट करणे,काम करणे,ई पीक पाहणी जनजागृती,अतिवृष्टी नुकसान पंचनामे,याद्या दुरुस्ती करणे आदी योजनेच्या लाभार्थ्यांच्या समस्या निवारण केले आहे.कोपरगाव तालुक्यात सप्टेंबर अखेर १ हजार ०८३ फेरफार प्रलंबित होते.त्यातील आज झालेल्या फेरफार अदालतीत जवळपास ७०० निकाली काढले आहे.

दरम्यान अजूनही पाऊस थांबलेला नाही मात्र ऑगष्ट मधील नुकसानीचे पंचनामे झाले असून त्यांची १.३१ कोटींची नुकसान भरपाई प्राप्त झाली आहे.ती दोन-तीन दिवसात खात्यावर वर्ग केली जाणार आहे.नंतर झालेल्या पावसाचे पंचनामे केले जाणार आहे.मात्र अद्याप पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही त्यामुळे पंचमाणे करण्यास अडचण येत आहे.मात्र पावसाने टप्पा दिल्यावर शेतकरी व नागरिक यांच्या नूकसानीचे पंचनामे करणार आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close