जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
महसूल विभाग

बदल्यांच्या ठिकाणी हजर व्हा अन्यथा सेवा खंडित करणार-…या नेत्यांचा इशारा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

शिर्डी-(प्रतिनिधी)

बदली झालेल्‍या ठिकाणी हजर न होणाऱ्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर आता कारवाई करून,त्‍यांची सेवा खंडीत करण्‍यात येईल असा इशारा महसूलमंत्री राधाकृष्‍ण विखे यांनी नुकताच दिला आहे त्यामुळे महसुली अधिकाऱ्यांत खळबळ उडाली आहे.

“राहुरी तालुक्‍यातील उंबरे येथील घटना अतिशय गंभीर असून,याची संपूर्ण चौकशी करण्‍याचे आदेश जिल्‍हा पोलिस अधीक्षकांना दिले आहेत.याबाबतची संपूर्ण माहिती पुढे आणण्‍यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्‍न करीत आहेत. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,यापूर्वी श्रीरामपूर तालुक्‍यात अशाच घटना घडल्‍या होत्‍या,त्‍यावेळी मोक्‍का कायद्यान्‍वये कारवाई करण्‍यात आली होती.उंबरे येथील घटना पाहता ज्‍या पोलिस ठाण्‍याच्‍या हद्दीत अशा घटना घडतील तेथील पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्‍याच्‍या सूचना यापूर्वीच दिल्‍या आहे”-राधाकृष्ण विखे,महसूल मंत्री,महाराष्ट्र राज्य.

स्थानिक प्रसार माध्‍यमांशी संवाद साधताना बोलताना महसूलमंत्री श्री.विखे पाटील म्‍हणाले की,”महसूल विभागातील बदल्‍यांची प्रक्रिया केव्‍हाच संपली आहे.त्‍यामुळे बदली झालेल्‍या ठिकाणी अनेक अधिकारी अद्याप हजर होत नसल्‍याच्‍या तक्रारी प्राप्‍त होत आहेत.याची गंभीर दखल आता विभागाने घेतली आहे.विदर्भ,मराठवाड्यातील ७० टक्‍के जागा यापूर्वी रिक्‍त होत्‍या,त्‍या सर्व जागांवर आता अधिकारी नियुक्‍त करण्‍यात आले आहेत.परंतू काही ठिकाणी अधिकारी हजर होत नसल्याने अशा अधिकाऱ्यांना आता निलंबनाच्‍या नोटीसा देण्‍यात आल्‍या असून,त्‍यांच्‍या विभागीय चौकशा आणि सेवा खंडीत करण्‍याचा निर्णयही वेळप्रसंगी विभागाला घ्‍यावा लागेल.असे ही त्यांनी सांगितले आहे.

राहुरी तालुक्‍यातील उंबरे येथील घटना अतिशय गंभीर असून,याची संपूर्ण चौकशी करण्‍याचे आदेश जिल्‍हा पोलिस अधीक्षकांना दिले आहेत.याबाबतची संपूर्ण माहिती पुढे आणण्‍यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्‍न करीत आहेत. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,यापूर्वी श्रीरामपूर तालुक्‍यात अशाच घटना घडल्‍या होत्‍या,त्‍यावेळी मोक्‍का कायद्यान्‍वये कारवाई करण्‍यात आली होती.उंबरे येथील घटना पाहता ज्‍या पोलिस ठाण्‍याच्‍या हद्दीत अशा घटना घडतील तेथील पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्‍याच्‍या सूचना यापूर्वीच दिल्‍या आहेत.परंतू समाजातील जबाबदार घटकांनीही पुढे येवून अशा प्रवृत्तीबद्दल पुढे येवून माहिती देण्‍याचे आवाहन महसूलमंत्री श्री.विखे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close