जाहिरात-9423439946
मनोरंजन

माळी युवक संघाच्या वतीने चित्रकला स्पर्धांचे आयोजन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

श्री संत सावता माळी युवक संघ,महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड यांच्या मार्गदर्शनाखाली संत सावता महाराज पुण्यतिथी सप्ताह निमित्त श्री संत सावता माळी युवक संघाच्या वतीने राज्यस्तरीय चित्रकला,मूर्ती,कॅलिग्राफी,स्केच,डिजीटल चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले आहे स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन संघाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांनी केले आहे.

रविवार दि.१९ जुलै रोजी महाराष्ट्राचे आराध्यदैवत आद्यसंत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी आहे.त्या निमित्त राज्यस्तरीय चित्रकला, मूर्ती, स्केच,डिजीटल चित्रकला,कॅलिग्राफी स्पर्धा कार्यक्रम आयोजित केला आहे.
आपण तयार केलेली श्री संत शिरोमणी सावता महाराज यांचे प्रसंगावर आधारित चित्र,मूर्ती,डिजीटल फोटो,कॅलीग्राफी,स्केच हे पी.डी. एफ. स्वरूपात santasawatamali@gmail.com या मेल आय.डी.वर १५ ऑगस्ट पर्यंत पाठवावा व सोबत स्पर्धकांचे नाव पत्ता मो.न.सह स्पर्धकांची संपूर्ण माहीती पाठवावी असे आवाहन केले आहे.

आपण काढलेले श्री संत सावता महाराज यांचे प्रसंगावर आधारित चित्र,साकारलेली मूर्ती,डिजीटल चित्र अशा स्पर्धकांना यांना प्रथम,द्वितीय,तृतीय प्राप्त स्पर्धकांना रोख रक्कम व प्रमाणपत्र श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य तर्फे सन्मानित करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमाचे नियम हे श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या हाती असतील.कोणीही चित्रकला,मूर्ती,डिझिटल चित्र पाठवू शकतात. या स्पर्धेसाठी वयाची कुठलीही अट नाही.सदर स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी आहे.तसेच सहभागी सर्व स्पर्धक यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.प्रथम पारीतोषीक-रोख रक्कम २१,१११/-सन्मानपत्र,द्वितीय पारीतोषीक – रोख रक्कम ११,१११/-सन्मानपत्र,तृतीय पारीतोषीक- रोख रक्कम ५५५५/-सन्मानपत्र सहभागी प्रत्येक स्पर्धकांना सन्मापत्र देण्यात येणार आहे.स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.कैलासराव शिंंदे करजगावकर
-९५०३९९२७४०,समाधान माळी सर-९८३४४३६५८७,प्रसाद शिंदे-९०७५१६१२१९.सदर स्पर्धेत महाराष्ट्रातील तमाम कलाशिक्षक, डिझायनर,घरघुती कलाकार,आदी पुरुष व महिलांनी ईच्छुकांनी जास्तीत जास्त संखेने सहभाग नोंदवावा,असे आवाहन संघाचे राज्य कार्याध्यक्ष कैलासराव शिंदे यांनी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close