जाहिरात-9423439946
मनुष्यबळ विकास

‘कॅम्पस इंटरव्यू’ मध्ये…या महाविद्यालयातील १०८ विद्यार्थ्यांची निवड !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव येथील के.जे.सोमैया वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘कॅम्पस इंटरव्यू’ मध्ये महाविद्यालयातील १०८ विद्यार्थ्यांची पुण्यातील नामांकित कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव व प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रो.(डॉ.) एस.आर.पगारे यांनी दिली आहे.

सोमैय्या महाविद्यालयातील प्लेसमेंट विभागाच्या वतीने आजपर्यंत विविध कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्यू झालेले असुन त्यामध्ये ६९८ पेक्षा अधिक विद्यार्थ्याना रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे.महाविद्यालयातील ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलअंतर्गत विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे कौशल्य-प्रशिक्षण तयारी करून त्यानंतरच विविध कंपन्यांचे मानव संसाधन अधिकारी यांना महाविद्यालयात आमंत्रित करून अशा प्रकारचे प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन केले जाते.

सदर कंपन्यामध्ये रिलायन्स मार्ट पुणे,अल्ट्रस्ट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड,फिन ड्राईव्ह सोलुशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मानव संसाधन विभागाचे प्रमुख संतोष स्वामी,तुषार मोरे व संतोष मोहिते यांनी विद्यार्थ्यांची लिखित व मौखिक तसेच ग्रुप डिस्कशन च्या माध्यमातून निवड केली आहे.या निवडीचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांना पदवी परीक्षेपूर्वीच आपली नियुक्ती पत्रेही कंपनीच्या वतीने सुपूर्द करण्यात आली आहे.
सदर विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या समाप्तीनंतर नियुक्त झालेल्या पदावर रुजू व्हायचे आहे.अशी निवड झालेले हे जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय असल्याचा दावा केला आहे.यामध्ये कला,वाणिज्य,विज्ञान व तंत्रज्ञान शाखेतील विविध विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

सोमैय्या महाविद्यालयातील प्लेसमेंट विभागाच्या वतीने आजपर्यंत विविध कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्यू झालेले असुन त्यामध्ये ६९८ पेक्षा अधिक विद्यार्थ्याना रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे.महाविद्यालयातील ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलअंतर्गत विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे कौशल्य-प्रशिक्षण दिले जाते.त्यांच्याकडून मुलाखतीची तयारी करून घेतली जाते आणि त्यानंतरच विविध कंपन्यांचे मानव संसाधन अधिकारी यांना महाविद्यालयात आमंत्रित करून अशा प्रकारचे प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन केले जाते.प्लेसमेंट विभागातून निवड झालेल्या या सर्व विद्यार्थ्यांचे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव अड्. संजीव कुलकर्णी,विश्वस्त संदीप रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव,रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे यांनी अभिनंदन केले आहे.

या ‘कॅम्पस इंटरव्यू’च्या सफल आयोजनामध्ये या सेलचे प्रमुख प्रो.(डॉ.) एस.आर.पगारे,डॉ.जी.के. चव्हाण,डॉ.एन.टी. ढोकळे, डॉ.सुरेखा भिंगारदिवे, प्रा.गुडघे व त्यांचे सहकारी प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close