पुरस्कार,गौरव
कोपरगावातील..या वैद्याचा नवी दिल्लीत सन्मान
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नुकताच आठव्यांदा राष्ट्रीय आयुर्वेद गुरु म्हणून नियुक्ती झालेले कोपरगाव येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ.रामदास आव्हाड यांचा दिल्ली येथील विज्ञानभवनात २६ व्या दीक्षांत समारंभात मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला आहे.
“कोपरगाव येथे राहून भारतभर निर्माण केलेल्या चार हजारहून अधिक शिष्यांचा हा गौरव असून भारत सरकार तर्फे मिळालेला हा सर्वोच्च सन्मान आजपर्यंत मिळालेल्या तेहतीस पुरस्कारापेक्षा अधिक महत्वपूर्ण व सन्मानाचा आहे”-डॉ.रामदास आव्हाड,आयुर्वेद तज्ज्ञ,कोपरगाव.
भारतातील तेरा जेष्ठ आयुर्वेद तज्ञांचा त्याच्या आयुर्वेद क्षेत्रातील दीर्घ व विशेष कार्याबद्दल,’रत्न-राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.यावेळी केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.सदर पुरस्कारात मानपत्र,स्मृतिचिन्ह,अमृत-कलश,शाल श्रीफळ आदींचा समावेश आहे.
सदर प्रसंगी केंद्रीय राज्य आयुष मंत्री डॉ मुंजपारा महेंद्रभाई,गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत,अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनचे वैद्य पद्मश्री पद्मभूषण देविंदर त्रिगुणा,आयुष सेक्रेटरी पद्मश्री डॉ.राजेश कोटेचा,डॉ.कौस्तुभ उपाध्याय (डायरेक्टर राष्ट्रीय आयु विद्यापीठ )आदी मायवर उपस्थित होते.
दरम्यान गुरु-शिष्य परंपरांतर्गत दरवर्षी हा दीक्षांत सोहोळा दिल्लीत पार पडत असतो.वयाने सर्वात लहान असलेल्या डॉ.रामदास आव्हाड यांचा हा सत्कार अन्य जेष्ठ वैद्यांच्या तुलनेत अधिक कौतुकाचा विषय ठरला आहे.
कोपरगाव येथे राहून भारतभर निर्माण केलेल्या चार हजारहून अधिक शिष्यांचा हा गौरव असल्याची विनम्र प्रतिक्रिया डॉ.आव्हाड यांनी यावेळी दिली आहे.भारत सरकार तर्फे मिळालेला हा सन्मान आजपर्यंत मिळालेल्या तेहतीस पुरस्कारापेक्षा अधिक महत्वपूर्ण व अभिमानाचा असल्याने तो आयुर्वेदावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व रुग्णांना समर्पित करत असल्याची प्रतिक्रिया यावेळी डॉ.रामदास आव्हाड यांनी शेवटी दिली आहे.