पुरस्कार,गौरव
महानंद संस्था चालविणे हि तारेवरची कसरत-जाणीव

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यातील सहकारात अग्रणी असलेली महानंद संस्था चालविणे हि तारेवरची कसरत असून ते दिव्य आता गोदावरी तालुका दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांना पेलावे लागणार असल्याचे प्रतिपादन अ.नगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
महाराष्ट्र राज्यातील सहकारी दूध संघांची शिखर संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई येथील महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या (महानंद) संचालकपदी गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांची बिनविरोध निवड झाली.त्याबाबद त्यांचा आज दुपारी ०२ वाजेच्या सुमारास संघाचे संचालक व कार्यकर्त्यांनी गोदावरी दूध संघाच्या कार्यस्थळावर सत्कार आयोजित केला होता त्यावेळी त्यावेळी त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानंदचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जाधव हे होते.
सदर प्रसंगी गोदावरी परजणे तालुका सहकारी दूध संघाचे उपाध्यक्ष संजय खांडेकर,शिर्डी नागरपंचायतीचे माजी अध्यक्ष कैलास कोते,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,भाजपचे माजी शहराध्यक्ष विनायक गायकवाड,सतीश कृष्णांनी,भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रभाकर वाणी,कोपरगाव बाजार समितीचे सचिव नानासाहेब रनशूर,दूध संघाचे संचालक यशवंत गव्हाणे,कोपरगाव बाजार समितीचे माजी अध्यक्ष सुरेश जाधव,रावसाहेब देशमुख,डॉ.आदिक,सुभाष होन,नाशिक प्रादेशिक उपायुक्त डॉ.संजय कुणकर,कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक सुरेश जाधव,भागवतराव धनवटे,सदाशिव कार्ले,मनीष शहा,राहुरी दूध संघाचे अध्यक्ष युवराज ढसाळ,अड्.एस.पी.खामकर,ऍड.बाळासाहेब कडू,जलसंपदाचे माजी उपअभियंता सुरळे,खंडूराज फेफाळे,भरत बोरणारे,संवत्सर ग्रामपंचायतीच्या सरपंच सुलोचना ढेपले,उपसरपंच विवेक परजणे,वडगावचे सरपंच संदीप सांगळे,सचिन अजमेरे,किशोर विभूते,दिलीप अजमेरे,रवींद्र गायधनी,कैलास जाधव,सूर्यभान परजणे,रमेश गायकवाड,डॉ.अरुण भांडगे,राजेंद्र शिरोडे,मुख्याध्यापक मोरे,आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी कार्यक्रमस्थळी उशिराने शालिनी विखे यांचे आगमन झाले होते.त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना बोलण्याचा आग्रह केला त्यावेळी त्यांनी शुभेच्छा देताना हे आव्हान लक्षात आणून दिले आहे.पूर्वी या संस्थेचे दहा लाख लि. दूध संकलन होत हॊते आता ते केवळ दीड लाखांवर आले आहे.त्यामुळे हे आव्हान पेलण्याची काम त्यांना करावे लागणार असल्याची जाणीव त्यांनीं करून दिली आहे.व यावेळी आपले पिता नामदेवराव पराजणे यांचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले आहे.
सदर प्रसंगी नूतन महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी सत्कार आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले आहे.व आपण आपल्या गोदावरी दुध संघ या मातृसंस्थेकडे दुर्लक्ष होऊ न देता हि जबाबदारी यशस्वीपणे पेलवू असा आशावाद व्यक्त केला आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शन राज्य पेस्टीसाईड संघटनेचे माजी अध्यक्ष कैलास ठोळे,राजेंद्र जाधव यांनी केले आहे.त्यांच्या भाषणाचा हाच सूर होता.सदर प्रसंगी उपस्थित मान्यवर व संचालकांनी राजेश परजणे यांचा सत्कार करण्यात आला आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिरालाल महानुभाव यांनी केले तर उपस्थितांचे गोदावरी दूध संघाचे संचालक माने यांनी मानले आहे.