गुन्हे विषयक
देवकर यांच्या धर्मपत्नीची विहिरीत उडी मारून आत्महत्या !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे तथा संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक स्व.पथाजी देवकर यांची धर्मपत्नी व विद्यमान संचालक निलेश पथाजी देवकर यांच्या मातोश्री जयमाला पथाजी देवकर (वय-६०) यांनी आपल्या सातचारी नजीक असलेल्या शेतातील गट क्रं.१६१ मधील विहिरीतील पाण्यात उडी मारून आपली जीवन यात्रा संपवली आहे.त्यामुळे याबाबत टाकळी व कोपरगाव तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
स्व.जयमाला देवकर या घरातून गायब झाल्यावर त्यांचा मुलगा निलेश देवकर यांनी शोध सुरु केला असता त्या मिळून आल्या नाहीत.त्या दररोज सकाळी सात वाजेच्या सुमारास त्या पायी फिरण्यासाठीसाठी जात असत.त्यामुळे त्या फिरण्यास गेल्या असतील असे सर्वांना वाटत असताना त्या निर्धारित वेळेत परत आल्या नाही म्हणून घरच्या हितैशी मंडळींनी त्यांचा शोध सुरु केला सदर प्रकार उघड झाला आहे.
स्व.पथाजी देवकर हे संजीवनी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे यांचे मेहुणे होते.चौदा महिन्यांपूर्वी त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते.त्यानंतर स्व.जयमाला देवकर या एकाकी जीवन जगत होत्या.त्यांच्या पश्चात एक मुलगा संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे संचालक निलेश देवकर आणि तीन मुली असा परिवार आहे.त्यांच्यावर टाकळी येथील स्मशान भूमीत काल दुपारी ०३ वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंकार करण्यात आले आहे.
स्व.जयमाला देवकर यांचे माहेर राहाता तालुक्यातील पाथरे येथील होते.त्या अ.नगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे यांच्या वर्ग मैत्रीण होत्या.तशी माहिती स्वतः शालिनी विखे यांनीच गोदावरी दूध संघ कार्यस्थळावर महानंदचे नूतन अध्यक्ष राजेश परजणे यांचा सत्कार करताना दिली आहे.
स्व.जयमाला देवकर या घरातून गायब झाल्यावर त्यांचा मुलगा निलेश देवकर यांनी शोध सुरु केला असता त्या मिळून आल्या नाहीत.त्या दररोज सकाळी सात वाजेच्या सुमारास त्या पायी फिरण्यासाठीसाठी जात असत.त्यामुळे त्या फिरण्यास गेल्या असतील असे सर्वांना वाटत असताना त्या निर्धारित वेळेत परत आल्या नाही म्हणून घरच्या हितैशी मंडळींनी त्यांचा शोध सुरु केला असता त्यांच्या चपला त्यांच्याच शेतीतील गट क्रं.१६१ मधील विहिरीच्या काठावरच संशयास्पदरित्या त्यांच्या चपला आढळून आल्याने त्यांचा संशय बळावला होता.त्यानंतर विहिरीत शोध घेतला असता त्यांचे शव आढळून आले आहे.त्यांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केला असता त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले आहे.एका माहितीनुसार त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु असताना त्याचे विपरीत परिणाम झाले होते.त्यातून त्या नैराश्यात गेल्या होत्या.त्यातून हा प्रकार घडल्याचे ग्रामस्थांत बोलले जात आहे.
स्व.जयमाला देवकर या अत्यंत मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून टाकळी आणि परिसरात परिचित होत्या.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सदर घटनास्थळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,आदींनी भेट दिली आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात सातचारी टाकळी येथील सातचारी येथील रहिवासी खबर देणार संदीप श्रीपत देवकर (वय-४९) यांनी अकस्मात मृत्यूची नोंद दाखल केली आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.०५/२०२३ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.डी.आर.तिकोणे हे करीत आहेत.