जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पुरस्कार,गौरव

अड्.काळे यांना,”कृषी रत्न योद्धा पुरस्कार” प्रदान

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

निळवंडे कालवा कृती समितीचे प्रसिद्ध वकील व उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ वकील संघाचे माजी अध्यक्ष अजित काळे यांनीं शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेऊन त्यासाठी न्यायीक लढा दिल्याने त्यांना नुकताच राज्यस्तरीय ग्लोबल ऍग्रो फौंडेशन (ट्रस्ट),शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना,महा ऍग्रो एफ.पी.सी.ग्रुप शेतकरी संघटना कामगार सहकार बचाव आंदोलन यांच्या संयुक्त वतीने राष्ट्रीय किसान परिषद व उत्पादक शेतकरी ते कृषी निर्यातदार प्रशिक्षण कार्यशाळेत नुकताच,”राज्यस्तरीय “कृषी रत्न योद्धा पुरस्कार” प्रदान करण्यात आला आहे.त्यांच्या या पुरस्कारा बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

या गळीत हंगामात शिल्लक उसाचा प्रश्न त्यांनी धसास लावण्यासाठी अड्.अजित काळे यांनी नुकतीच श्रीरामपूर येथे,”ऊस शेतकरी परिषद” घेतली आहे.शेती सिंचनाच्या प्रश्नांचा त्यांचा विशेष अभ्यास असून त्यांनी नुकतेच आ.आशुतोष काळे यांनी मंजूर केलेले कोपरगाव शहराला मिळालेले ३.३२ द.ल.घ.मी.बिगर सिंचन पाणी व १३१.२४ कोटी रुपये खर्चाचा साठवण तलाव याला असामाजिक तत्त्वापासून स्थगीती मिळविण्यापासून नुकतेच वाचवले आहे.त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,अड् अजित काळे हे शेतकरी संघटनेचे माजी प्रदेश उपाध्यक्ष स्व.बबनराव काळे यांचे सुपुत्र असून ते आपली विधी सेवा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गरजू व्यक्ती संघटना आदींना पुरवत असतात.त्यांनी अनेक गरजू व्यक्तींना आपल्या विधी ज्ञानातून अनेकांना न्याय दिला आहे.त्यातच त्यांनी उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षण ग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे कालव्यांना न्याय देण्यासाठी निळवंडे कालवा कृती समितीच्या हाकेला ‘ओ’ दिली होती.त्या प्रलंबित कालव्यांना ४९ वर्षांनी न्याय मिळाला असून हा प्रश्न सन-२०१९ धसास लावला आहे.त्यासाठी मोफत विधी सेवा दिली आहे.त्यामुळे सहकारी साखर कारखान्यांनी व त्यांच्या नेत्यांनी निळवंडे कालव्यांचे अडविलेले पाणी या १८२ दुष्काळ पीडित गावांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.हे काम अंतिम टप्यात असून यावर्षी पावसाळ्यात देणार असल्याचे राज्य सरकारने उच्च न्यायालयात लेखी प्रतिज्ञा पत्रात दिले आहे.त्या दिशेने वेगाने काम सुरु आहे.त्यात कालवा समितीसह अड्.काळे यांचा सिहांचा वाटा आहे.या शिवाय त्यांनी शेतकरी संघटनेसाठी मोठे योगदान दिले असून शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांचे नेतृत्वाखाली प्रदेश उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत.

अड्.काळे यांनी गणेश सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांचे सेवानिवृत्ती वेतन मिळून देण्यात अहंम भूमिका निभावली आहे.या शिवाय आकारी पडीत शेतकऱ्यांचा प्रश्न त्यांनी धसास लावण्यासाठी हाती घेतला आहे.नगर जिल्ह्यातील अनेक सहकारी साखर कारखान्यात होत असलेला गैरव्यवहाराला त्यांनी वाचा फोडली आहे.

या गळीत हंगामात शिल्लक उसाचा प्रश्न त्यांनी धसास लावण्यासाठी नुकतीच श्रीरामपूर येथे,”ऊस शेतकरी परिषद” घेतली आहे.शेती सिंचनाच्या प्रश्नांचा त्यांचा विशेष अभ्यास असून त्यांनी नुकतेच आ.आशुतोष काळे यांनी मंजूर केलेले कोपरगाव शहराला मिळालेले ३.३२ द.ल.घ.मी.बिगर सिंचन पाणी व १३१.२४ कोटी रुपये खर्चाचा साठवण तलाव याला असामाजिक तत्त्वापासून स्थगीती मिळविण्यापासून नुकतेच वाचवले आहे.

त्यांच्या या पुरस्काराबाबत शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथ दादा पाटील,कार्याध्यक्ष कालिदास आपेट,क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव नांदखिले,जिल्हाध्यक्ष अनिल औताडे,युवराज जगताप,अड्,प्रशांत माने,निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,कार्याध्यक्ष मच्छीन्द्र दिघे,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,सोन्याबापू उऱ्हे (सर)माजी उपाध्यक्ष रमेश दिघे,गंगाधर रहाणे,कौसर सय्यद,तानाजी शिंदे,(सर)संघटक नानासाहेब गाढवे,उत्तमराव जोंधळे,विठ्लराव देशमुख,सचिव कैलास गव्हाणे,सहसचिव संदेश देशमुख,बाबासाहेब गव्हाणे,रंगनाथ गव्हाणे,ज्ञानदेव शिंदे गुरुजी,रामदास ढमाले,विक्रम थोरात,अड्.योगेश खालकर,विठ्लराव पोकळे,नामदेव दिघे,पाटीलबा दिघे,शरद गोर्डे,संतोष गाढवे,शिवनाथ आहेर,बाळासाहेब सोनवणे,आबासाहेब सोनवणे,गोरक्षनाथ शिंदे,भाऊसाहेब चव्हाण,रामनाथ पाडेकर,नवनाथ शिरोळे,वाल्मिक नेहे,सचिन मोमले,आप्पासाहेब कोल्हे,संभाजीनगर वकील संघाचे पदाधिकारी व सदस्य आदींनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close