पुरस्कार,गौरव
डॉ.वाघ महाराष्ट्राच्या नवीन “मेडीक्वीन ग्लॅमरस व स्टायलिश वुमन-२०२२”पुरस्कार

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नुकतीच पुणे येथील हॉटेल ऑर्किड येथे मानाच्या महाराष्ट्र मेडीक्वीनची अंतिम फेरी झाली असून यात नाशिक येथील प्रसिद्ध स्त्री आयुर्वेद तज्ञ वैद्या सौ.मयुरी वाघ पहिल्याच प्रयत्नात टॉप १० मध्ये सिलेक्ट होऊन महाराष्ट्र “मेडिक्वीन ग्लॅमरस व स्टायलिश वुमन” या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत.त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मेडीक्वीन मेडिको पॅजेंटच्या कार्यकारी अध्यक्षा डॉ.प्रेरणा बेरी आणि सचिव डॉ.प्राजक्ता शाह यांच्या कडून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या विवाहित महिलांसाठी हि स्पर्धा दर वर्षी आयोजित केली जाते.२०२२ च्या या स्पर्धेसाठी प्रसिद्ध अभिनेते समीर धर्माधिकारी,अभिनेत्री पूजा सावंत,डॉ.रेवती राणे,डॉ.उज्वला बर्दापूरकर,आदींनी परीक्षक म्हणून काम पाहीले होते.
संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून दोनशेहून अधिक महिला डॉक्टरचा सहभाग असलेली मानाची,”महाराष्ट्र मिसेस मेडीक्वीन” हि स्पर्धा दर वर्षी पुणे येथे होत असते.या स्पर्धेसाठी माननीय सुनेत्राताई अजित पवार,शीतल रांका सह महाराष्ट्रातील अनेक डॉक्टर्स उपस्थित होते.
मेडीक्वीन मेडिको पॅजेंटच्या कार्यकारी अध्यक्षा डॉ.प्रेरणा बेरी आणि सचिव डॉ.प्राजक्ता शाह यांच्या कडून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या विवाहित महिलांसाठी हि स्पर्धा दर वर्षी आयोजित केली जाते.२०२२ च्या या स्पर्धेसाठी प्रसिद्ध अभिनेते समीर धर्माधिकारी,अभिनेत्री पूजा सावंत,डॉ.रेवती राणे,डॉ.उज्वला बर्दापूरकर,आदींनी परीक्षक म्हणून काम पाहीले होते.
रुग्णसेवेचे काम सांभाळत पहिल्याच प्रयत्नामध्ये मेडीक्वीनच्या या सौंदर्य स्पर्धेत मेडीक्वीन ग्लॅमरस आणि स्टायलिश वुमन ठरलेल्या डॉ.मयुरी आव्हाड-वाघ या कोपरगाव येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ.रामदास आव्हाड यांच्या कन्या असून नाशिक येथील एम.व्ही.पी.चे प्राध्यापक शिवाजीराव वाघ यांच्या स्नुषा आहे.कुठलीही माहिती व मार्गदर्शन नसतांना या स्पर्धेत मिळविलेले हे यश कौतुकास्पद असून या यशाबद्दल त्यांचे असल्याने सर्व डॉक्टर्स संघटनेतर्फे डॉ.मयुरी आव्हाड-वाघ यांचे अभिनंदन होत आहे.