जाहिरात-9423439946
पुरस्कार,गौरव

…या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे,’हॉलीबॉल’ स्पर्धेत यश

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

    रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या असून त्यात व्हॉलीबॉल स्पर्धांमध्ये कोकमठाण येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसीच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लक्षवेधी कामगिरी केली असून त्यांची राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.त्यांच्या यशाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

   

“स्पर्धा या खेळाडुंच्या जीवनाचा एक भाग असतो त्यात प्रत्येक विद्यार्थ्यांचे प्रत्येक स्पर्धेतील खेळात भाग घेऊन आपल्या कला कौशल्याला वाव दिला पाहिजे.तसेच कोणताही खेळ खेळाडूसाठी एखादी स्पर्धा अंतिम असू शकत नाही”-दिपक कोटमे.कोकमठाण.

व्हॉलीबॉल स्पर्धेत आर जे एसच्या विद्यार्थीनीच्या संघाने प्रथम पारितोषिक पटकावले तसेच विद्यार्थ्यांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली.या स्पर्धेतून जागृती डमडेरे,गुंजन विखे,जयश्री गावित,काजल चिंधे,आणि  ऋतिक जपे या विद्यार्थ्यांची पुणे झोनल विभागातून (DBATU) विद्यापीठ संघात निवड करण्यात आली आहे.

दरम्यान यास्पर्धा मधील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष चांगदेव कातकडे,संस्थेचे सचिव प्रसाद कातकडे,विजय कडू,दिपक कोटमे,फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नितीन जैन,उपप्राचार्या उषा जैन,क्रिडा प्रमुख सचिन चव्हाण आदींनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close