जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पशुसंवर्धन विकास

उत्तर नगर जिल्ह्याला ‘लंपी स्किन’ रोग भिडला..! पशुपालकांत खळबळ

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

वर्तमानात अ.नगर सह जळगाव,अकोला,पुणे व धुळे जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’ या त्वचारोगाचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये वेगाने होत असताना.अ.नगर जिल्ह्यात आतापर्यंत ११६ जनावरांना या आजाराची लागण झाली होती मात्र कोपरगाव तालुक्यातही या आजाराची लागण झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली असून यात आ.आशुतोष काळे यांच्या माहेगाव देशमुख या गावाचा समावेश आहे.दरम्यान या आजाराच्या प्रतिबंधासाठी तालुका पशुसंवर्धन विभागाने युध्दपातळीवर उपाययोजना सुरु केल्या असून लसीकरण करण्यास प्रारंभ केला असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीस मिळाली आहे.त्यामुळे तालुक्यातील पशुपालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

“जनावरांमधील लंपी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाबरोबरच डास व माशांचा बंदोबस्त करण्यासाठी रासायनिक औषधांची फवारणी करण्यात येत आहे.तसेच पशुपालकांना या रोगाची लक्षणे व उपाय योजना याविषयी माहिती साठी प्रचार व प्रसिद्धी करणारे फलक गावोगावी लावण्यात आले आहे याशिवाय सामाजिक संकेतस्थळाद्वारे देखील पशुपालकांना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना संदर्भात अवगत करण्यात येत आहे”-सचिन सूर्यवंशी,गटविकास अधिकारी तथा प्रशासक,कोपरगाव पंचायत समिती.

दरम्यान या गावातील पशुधनाला लसीकरण करण्यास प्रारंभ झाला आहे.त्यात माहेगाव देशमुख येथील गायवर्गीय ६ हजार ३०० पैकी ०५ हजार ५०० गायवर्गीय जनावरांना लसीकरण देऊन झाले आहे.त्या साठी ‘गॉटपॉक्स’ हि लस वापरण्यात येत आहे.त्यासाठी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ.श्रद्धा काटे व त्यांचे सहकारी प्रयत्न करत आहेत.

‘लम्पी स्कीन’ हा रोग १९२९ पासून १९७८ पर्यंत मुख्यत्वे आफ्रिकेत आढळत होता.नंतर हळूवारपणे या रोगाने शेजारच्या देशात शिरकाव केला.२०१३ नंतर या रोगाचा सर्वदूर प्रसार वेगाने होत आहे.आणि आता हा रोग अनेक युरोपीय व आशियायी देशात पसरला आहे.भारतात या रोगाची पहिली नोंद ऑगस्ट २०१९ मध्ये ओरिसा राज्यात झाली.त्यानंतर झारखंड,पश्चिम बंगाल, छत्तीसगड,तेलंगणा,आंध्रप्रदेश,कर्नाटक व केरळ राज्यात या आजाराचा शिरकाव झालेला आढळून आला.महाराष्ट्रात या आजाराचा प्रसार गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथून मार्च २०२० या महिन्यापासून झालेला आढळून आलेला आहे.येथील साथरोगाचे पक्के निदान गोपाळ येथील राष्ट्रीय रोगनिदान प्रयोगशाळेत झाले आहे.आता दूर असणारीं हि साथ कोपरगाव तालुक्याला येऊन भिडली आहे.त्याचा पहिला फटका विशेषतः कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांच्या गावातील माहेगाव देशमुख येथील पशुपालकांना बसला असल्याचे दिसून येत आहे.यात माहेगाव देशमुखचे सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे यांचे गायीला लागण आल्याचे दिसून आले आहे.त्या नंतर आ.आशुतोष काळे यांच्या गोठ्यातील गायीला लागण झाल्याचे धक्कादायक वृत्त हाती आले आहे.त्यामुळे पशुसंवर्धन विभाग खडबडून जागा झाला असून त्यांनी तातडीने पावले उचलले आहे.व या गावातील सीमा व अन्य ०५ कि.मी.अंतरातील नऊ गावातील सीमा कोरोना साथीला प्रतिबंध करतात तशा बंद केल्या आहेत.

दरम्यान या गावातील पशुधनाला लसीकरण करण्यास प्रारंभ झाला आहे.त्यात माहेगाव देशमुख येथील गायवर्गीय ६ हजार ३०० पैकी ०५ हजार ५०० गायवर्गीय जनावरांना लसीकरण देऊन झाले आहे.त्या साठी ‘गॉटपॉक्स’ हि लस वापरण्यात येत आहे.त्यासाठी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ.श्रद्धा काटे व त्यांचे सहकारी प्रयत्न करत आहेत.

दरम्यान गोधेगाव येथील गायवर्गीय प्राण्यास लागण झाल्याची माहिती मिळाली होती.त्यासाठी तातडीने गटविकास अधिकारी यांनी तेथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले होते.मात्र तो आजार सामान्य निघाल्याने तालुका पशुवैद्यकीय अधिकांऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close