जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
परिवहन विभाग

  वाहन चालकांसाठी…या कंपनीतर्फे प्रशिक्षण

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगांव तालुक्यातील गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघातील वाहन चालकांसाठी स्वराज माझदा कंपनी व अ.नगर येथील  पाटील मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन तंत्रज्ञानयुक्त प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.अनेक वाहन चालकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

  

या प्रशिक्षण वर्गात वाहन चालकांना नव-नवीन तंत्रज्ञानाबाबत माहिती देण्यात आली.रस्त्यावर होत असलेल्या अपघाताचे प्रमाण विचारात घेता अशा प्रसंगामधून सुरक्षित वाहने कशी चालवावीत व इंधन बचत कशी करता येईल याबाबत स्वराज माझदा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले आहे.

  गोदावरी दूध संघाच्या कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण वर्गापूर्वी संघाचे अध्यक्ष राजेश परजणे व स्वराज माझदा कंपनी तसेच पाटील मोटर्सचे अधिकारी यांच्याहस्ते नवीन वाहनांचे पूजन करण्यात आले.यावेळी स्वराज माझदाचे क्षेत्रिय अधिकारी विजय सूर्यवंशी,झोनल मॅनेजर निरज सक्सेना,पुणे व अ.नगरचे सर्व्हीस मॅनेजर नंदकुमार बनसोडे,अ.नगर व छ.संभाजी नगरचे सेल्स मॅनेजर शेरखान,झोनल विझनेस हेड आशीष नाईक,पाटील मोटर्सचे मालक भगवान पाटील व चंद्रकांत पाटील यांच्यासह गोदावरी दूध संघाचे संचालक उत्तमराव डांगे पाटील,कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे, संघाचे गॅरेज विभाग प्रमुख गजेंद्र साबळे, प्रदीप चिने यांची उपस्थिती होती.

    या प्रशिक्षण वर्गात वाहन चालकांना नव-नवीन तंत्रज्ञानाबाबत माहिती देण्यात आली.रस्त्यावर होत असलेल्या अपघाताचे प्रमाण विचारात घेता अशा प्रसंगामधून सुरक्षित वाहने कशी चालवावीत व इंधन बचत कशी करता येईल याबाबत स्वराज माझदा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करुन वाहन चालाकांच्या शंकांचे निरसन केले.वाहन चालकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनाही प्रशिक्षकांनी समाधानकारक उत्तरे देऊन वाहन चालविताना चालकांनी सतत सतर्क रहावे असे आवाहन केले.

  या प्रसंगी संघाचे वाहन चालक तसेच अधिकारी,खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.पाटील मोटर्सचे व्यवस्थापक अक्षय गायकवाड यांनी आभार व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close