पणन
ऑनलाईन खरेदीच्या वस्तू परत करण्याच्या प्रमाणात वाढ!

न्यूजसेवा
मुंबईः
ऑनलाइन खरेदी केलेल्या वस्तू परत करण्याचा ट्रेंड सर्व प्रकारच्या वस्तूंमध्ये आहे. त्यातही कपड्यांमध्ये तो ५० टक्क्यांपर्यंत आहे. कोविड काळात, वस्तूंच्या ऑनलाइन खरेदीसह परतीचा कलही वाढल्याचं यावरुन दिसून येतं.
“परत आलेल्यापैकी सुमारे १५ टक्के वस्तूंचा कचरा होतो. त्याची विल्हेवाट लावावी लागते. ब्रायन म्हणतात, या वर्तनात बदल करणं आवश्यक आहे. कारण परतावा मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करतो, जो पर्यावरणास हानिकारक ठरतो. यातून दर वर्षी १५ दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन होतं”-ब्रायन
‘झिगझॅग ग्लोबल’चे रिटर्न्स स्पेशालिस्ट अल गॅरी म्हणतात की आता ४० टक्क्यांपेक्षा जास्त खरेदीदार एखादी वस्तू ऑर्डर करताना किमान एक वस्तू परत करण्याचा विचार करतात, असं जाणवतं. कोविडपूर्वी हेच प्रमाण ३० टक्के होतं. टाळेबंदीमध्ये लोक ऑनलाइन शॉपिंगबद्दल अधिक जागरूक झाले आहेत. २०२५ पर्यंत ब्रिटनमध्ये ऑनलाईन वस्तूंच्या व्यापारात नऊ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. ‘ग्लोबल डेटा’च्या विश्लेषणानुसार, ग्राहकांनी २०२० मध्ये ब्रिटनमध्ये ५९ हजार ६१८.५१ कोटी रुपयांची उत्पादनं परत केली. २०२५ पर्यंत त्यात ९नऊ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. कोविड लॉकडाऊन संपल्यानंतर, विशेषत: कपड्यांमध्ये नवीन ट्रेंड आयटम्स आल्यानंतर, ग्राहकांनी विविध प्रकारच्या दोन उत्पादनांची ऑर्डर देण्यास सुरुवात केली. मात्र त्यातली एक वस्तू वापरून पाहिल्यानंतर परत येऊ लागली.
‘ग्लोबल डेटा’चे पॅट्रिक आयटम ओ’ब्रायन सांगतात की, जगातल्या वाढत्या महागाईमुळे ग्राहक त्यांच्या वस्तूंच्या खरेदीबाबत अधिक जागरुक झाले आहेत. परत येणारे पाच टक्के कपडे पुनर्विक्रीच्या स्थितीत नाहीत. परत आलेल्या वस्तूंपैकी फक्त ५० ते ८० टक्के वस्तू तात्काळ विकल्या जाऊ शकतात. उर्वरित वस्तू रिक्त-प्रक्रियेसाठी पाठवल्या जातात. तिथून त्या इतर ऑनलाइन विक्रेते किंवा शोरूममधून विकल्या जातात. परत आलेल्यापैकी सुमारे १५ टक्के वस्तूंचा कचरा होतो. त्याची विल्हेवाट लावावी लागते. ब्रायन म्हणतात, या वर्तनात बदल करणं आवश्यक आहे. कारण परतावा मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करतो, जो पर्यावरणास हानिकारक ठरतो. यातून दर वर्षी १५ दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन होतं. माल परत केल्याने नफ्यावरच वाईट परिणाम होत नाही, तर पर्यावरणालाही हानी पोहोचते. कार्बन उत्सर्जन वाढतं.