जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

जामीनदाराचा धनादेश वटला नाही,एक महिण्याची शिक्षा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात सहकारात अग्रणी असलेल्या शुभम नागरी पतसंस्थेच्या जामीनदाराने दिलेला बँकेचा धनादेश वटला नाही या कारणावरून कोपरगाव येथील वरिष्ठ स्तर न्यायालयात सुनावणी संपन्न होऊन त्यात आरोपी जामीनदार भिकचंद रामलाल पांडे यास येथील न्यायालयाने एक महिन्याची साध्या कारावासाची शिक्षा व फिर्यादी संस्थेस ५ लाख ५० हजारांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिल्याने कर्जदार व जमीनदारात भीतीचे वातावरण पसरले आहे.

जामीनदाराने आपल्या कर्जदाराच्या सोयीसाठी दिलेला धनादेश वटला नाही परिणामी जामीनदारच अडचणीत आला आहे.त्या बाबत कर्जदार संस्था यांनी कोपरगाव येथील वरिष्ठ स्तर या न्यायालयात दावा दाखल केला होता.त्यात न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे एकूण घेतले होते.त्यात कोपरगावातील जामीनदार भिकचंद पांडे हा अडचणीत आला असून दोषी आढळला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,बँकेचे व्यवहार करताना अनेकदा चेकचा वापर केला असेल.धनादेश किंवा चेक ही पेमेंटची लोकप्रिय पद्धत आहे.चेकने व्यवहार करणे सर्वात सुरक्षित मानले जाते. चेक हे बँकिंग प्रणालीचे एक असे साधन आहे,ज्याद्वारे एखादी व्यक्ती बँकेला एखाद्या विशिष्ट व्यक्तीला पैसे देण्याचे आदेश देते.ज्या व्यक्तीला पैसे द्यायचे आहेत,त्याचे नाव चेकमध्ये लिहावे लागते.यात एखाद्या व्यक्तीचे किंवा कंपनीचे नाव देखील नाव असू शकते.चेकमध्ये रक्कम लिहावी लागते,तसेच चेकच्या खालच्या बाजूला सही करणे आवश्यक असते.मात्र दिलेला धनादेश वटला नाही तर सम्बधित संस्था कलम १३८ प्रमाणे धनादेश देणाऱ्या व्यक्तीवर न्यायालयात दावा दाखल करू शकते.अशीच घटना नुकतीच कोपरगाव येथील शुभम सहकारी बँकेच्या जामीनदार भिकचंद पांडे यांच्या बाबतीत घडली आहे.

जामीनदाराने आपल्या कर्जदाराच्या सोयीसाठी दिलेला धनादेश वटला नाही परिणामी जामीनदारच अडचणीत आला आहे.त्या बाबत कर्जदार संस्था यांनी कोपरगाव येथील वरिष्ठ स्तर या न्यायालयात दावा दाखल केला होता.त्यात न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे एकूण घेतले होते.त्यात जामीनदार अडचणीत आला असून दोषी आढळला आहे.त्यामुळे शुभम नागरी सहकारी पतसंसंस्थेने आपल्या २ लाख ७५ हजार रुपये रकमेसाठी रीतसर दावा(ए.सी.सी.क्रं.२१८/२०१६) निगोशिएबल इंस्टूमेन्ट ऍक्ट कलम १३८ प्रमाणे दाखल केला होता.त्याची सुनावणी नुकतीच संपन्न झाली होती.त्यात जामीनदार भिकचंद पांडे दोषी आढळला होता.

दरम्यान या दाव्यात न्यायालयाने त्यास दोषी घोषित करून त्यास एक महिन्याची साधी शिक्षा सुनावली आहे.याशिवाय न्यायालयात जमा असलेली रक्कम पन्नास हजार हि भरपाई पोटी फिर्यादी संस्थेस दिली आहे.नुकसान भरपाई देण्यास कसूर केल्यास सहा महिन्यांची पुन्हा शिक्षा सुनावली जाणार आहे.
या खटल्यात संस्थेच्या वतीने अड्.एम.पी.गुजराथी यांनी काम पाहिले होते.या निकालाने कोणालाही जामीनदार होताना काळजी घेणे गरजेचे आहे हा धडा जामीन दारांना मिळाला असल्याचे बोलले जात आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close