न्यायिक वृत्त
कोपरगावातील ‘त्या’ बहुचर्चित गुंह्यातील आरोपी निर्दोष !
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहरातील मतिमंद मुलीवर दि.०४ जुलै २०१७ रोजी लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी अटक असलेला आरोपी रवींद्र उर्फ नव्वा सुखदेव मोरे याच्यावर दाखल असलेल्या खटल्याची सुनावणी कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती सयाजी कोऱ्हाळे यांचे न्यायालयात संपन्न झाली असून यात अड्.एम.पी.येवले यांचा युक्तिवाद न्यायालयाने गृहीत धरून आरोपीस निर्दोष मुक्त केले आहे.
या गुन्ह्यातील आरोपीस मोरे हा बहुसंख्याक तर मुलगी अल्पसंख्याक समाजातील असल्याने काही असामाजिक तत्त्वांनी या गुन्ह्यास अनेकांनी जातीयवादी रंग दिला होता.त्यातून औरंगाबाद,मालेगाव,नाशिक येथील अल्पसंख्याक समाजातील राजकारण्यांनी कोपरगाव शहरात डॉ.आंबेडकर मैदानातून मोठा मोर्चा काढण्यात आला होता.”कोपरगाव को जला देंगे” अशा घोषणा ऐकू आल्या होत्या.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या गांधीनगर येथील मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात प्रमुख आरोपी रवींद्र मोरे याचे विरुद्ध भा.द.वि.कलम ३६३,३७६,(१) (२) (एल).(डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.व या गुन्ह्यातील आरोपीस मोरे हा बहुसंख्याक समाजातील असल्याने तर मुलगी अल्पसंख्याक समाजातील असल्याने काही असामाजिक तत्त्वांनी या गुन्ह्यास अनेकांनी जातीयवादी रंग दिला होता.या गुन्ह्याला विकृत रंग देण्यात येऊन औरंगाबाद,मालेगाव,नाशिक,आदी ठिकाणच्या अल्पसंख्याक समाजातील राजकारण्यांनी शहरात मोठा मोर्चा काढून यास जातीयवादी रंग देण्याचा प्रयत्न केला होता.त्यामुळे कोपरगाव शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता.त्यातून कोपरगाव शहरात डॉ.आंबेडकर मैदानातून मोठा मोर्चा काढण्यात आला होता.”कोपरगाव को जला देंगे” अशा घोषणा ऐकू आल्या होत्या.
कोपरगाव शहरातील काहि अल्पसंख्याक समाजातील नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी यास खतपाणी घातले होते.प्रचार माध्यमातील प्रतिनिधींवर गुन्हे दाखल करण्यापर्यंत व आमच्या प्रतिनिधींच्या कार्यालयाची मोडतोड करण्यापर्यंत काही असामाजिक तत्वांची मजल गेली होती.त्यात मोठे नुकसान झाले होते.मात्र या घटनेतील वास्तव वेगळे होते हे आमच्या प्रतिनिधीने दाखविण्याचा प्रयत्न केला होता. ( याचा अर्थ आरोपीची बाजू घेतली नव्हती ) तर या प्रकरणात कोपरगाव तालुक्यातील काही राजकीय नेत्यांनी आपल्या पोळ्या भाजल्या होत्या.
या गुंह्यातील आरोपी मोरे यास कोपरगाव शहर पोलिसांनी अटक केली होती.त्यास जिल्हा व सत्र न्यायालय व उच्च न्यायालयाने जामीन नाकारला होता.त्यामुळे आरोपीस कारागृहात ठेऊन हा खटला चालविला गेला होता.
सदर खटल्यात एकूण सरकारी पक्षातर्फे नऊ महत्वपूर्ण साक्षिदार तपासण्यात आले होते.त्यात तीन वैद्यकीय अधिकारी,दोन पोलीस अधिकारी,आदींचा समावेश होता.न्याय वैद्यक शाळेचे अहवाल,साक्षीदारांचे जाबजबाब यातील अत्यंत बारीक बारीक बाबी,तफावती त्रुटी,विसंगती,आरोपीचे वतीने अड्.एम.पी.येवले यांनी न्यायालयाचे निदर्शनास आणून दिल्या होत्या.सदर गुन्ह्यात जामीन नाकारल्याने याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरु होती.या गंभीर प्रकरणाचे आव्हान आरोपी समोर उभे होते.त्याचे सर्व पुरावे अड्,येवले यांनी मांडले होते.त्यातील विसंगती न्यायालयाने गृहीत धरून जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीची सदर गुन्ह्यातून निर्दोष सुटका केली आहे.