न्यायिक वृत्त
‘त्या’लुटीतील आरोपी जेरबंद,कोपरगावात दोन दिवसांची पोलीस कोठडी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
येवला तालुक्यातील सुरेगाव येथील रहिवासी असलेले फिर्यादी बाबासाहेब आहेर (वय-४९) यांच्या मालकीचा ५.५१ लाख रुपये किमतीचा लाल रंगाचा सोलीस या कम्पणीचा जुगडासह ट्रॅक्टर,व एक भ्रमणध्वनिसह काही चोरट्यानी कोपरगाव तालुक्यातील येसगाव ग्रामपंचायत हद्दीतून पळवून नेलेल्या ट्रॅक्टरच्या गुंह्यातील आरोपी पंडित वाघ शिरूर जि.पुणे यास येसगाव शिवारातून कोपरगाव तालुका पोलिसांनी जेरबंद केला असून त्याला कोपरगाव प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रफिक शेख यांचे समोर हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
दरम्यान या ट्रॅक्टर चोरी प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी या चोरट्यांचे आव्हान स्वीकारले होते.व तातडीने तपास सुरु केला होता.व चोरट्यांच्या संशयावरून व फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीनुसार तपास सुरु केला असता त्यांनी अवघ्या ४८ तासात पहिला आरोपी पंडित भीमराव वाघ रा.ममदापुर ह.मु.न्हावरा कारखाना ता.शिरूर जि.पुणे यास येसगाव शिवारातून जेरबंद केला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी बाबासाहेब आहेर हे येवला तालुक्यातील सुरेगाव येथील रहिवासी असून त्यांचा ट्रॅक्टरच्या सहाय्याने ऊस वाहतुकीचा व्यवसाय आहे.दि.११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ०५ वाजेच्या सुमारास नगर-मनमाड महामार्गावर येसगाव जवळ सदर ट्रॅक्टर जात असताना महिंद्रा बोलेरो गाडीतून आलेले संशयित चार आरोपी यांनी आपली गाडी ट्रॅक्टरला आडवी घालून ट्रॅक्टर आडवून दमदाटी देऊन भ्रमणध्वनिसह फिर्यादीच्या मालकीचा ५.५१ लाख रुपये किमतीचा लाल रंगाचा सोलीस या कम्पणीचा जुगडासह ट्रॅक्टर,व एक भ्रमणध्वनिसह चार अज्ञातच चोरट्यानी कोपरगाव तालुक्यातील येसगाव ग्रामपंचायत हद्दीतील नगर-मनमाड महामार्गावरून पळवून नेला होता.त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.४५/२०२२ भा.द.वि.कलम ३९२,३४१,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.या भर रस्त्यात घडलेल्या गुन्ह्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्मांण केले होते.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी या चोरट्यांचे आव्हान स्वीकारले होते.व तातडीने तपास सुरु केला होता.व चोरट्यांच्या संशयावरून व फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीनुसार तपास सुरु केला असता त्यांनी अवघ्या ४८ तासात पहिला आरोपी पंडित भीमराव वाघ रा.ममदापुर ह.मु.न्हावरा कारखाना ता.शिरूर जि.पुणे यास जेरबंद केला आहे.
दरम्यान त्यास आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास कोपरगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रफिक शेख यांचे समोर हजर केले सता त्यास दोन्ही बाजू ऐकून न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलिस अधिकाऱ्यांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पो.नीं.सुरेश आव्हाड हे करीत आहेत.