न्यायिक वृत्त
लाच स्वीकारल्या प्रकरणी तलाठ्याची निर्दोष मुक्तता
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील लोणी येथील तलाठी के.एम.गटकळ यांना सन-२०१२ साली लाच लुचपत विभागाने त्यांना रुपये १५०० रुपयांची लाच घेताना अटक करुन गुन्हा दाखल केला होता.त्याबाबत कोपरगाव येथील जिल्हा न्यायालयातील शिक्षेच्या निकालानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील केले होते.त्या बाबत नुकतीच सुनावणी पूर्ण होऊन त्यांना उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त करून त्यांना सूनावलेल्या दंडाची रक्कम परत करण्याचा आदेश दिला आहे.
तक्रारदार व लोकसेवक यांच्याशी संवादात लोकसेवक गटकळ हे कोठेही पैशाची मागणी करत नाही हे सप्रमाण सिद्ध केले होते.शिवाय हि लाचेची तक्रार दाखल होण्या अगोदर तक्रारदार याचे विरुद्ध भा.द.वि.कलम ४२० व ३४ प्रमाणे गुन्हा लोणी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.त्यात तक्रारदार यास दुरुस्त ७/१२ उतारा लागत होता.तलाठी गटकळ यांनी त्यास नकार दिला म्हणूनच लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती हि बाब लक्षात आणून दिली होती.त्यानंतर हा निकाल हाती आला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादीच्या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर बेकायदेशीर नोंद घेण्याचे लोणी येथील आरोपी तलाठी के.एम.गटकळ यांनी फिर्यादिस नाकारले होते.बाबत लोणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली होती.त्याचा मनात राग धरून फिर्यादीने आपल्या मेहुण्यामार्फत सम्बधित तलाठी यास ७/१२ उताऱ्यात नोंद करण्यासाठी गळ घालून त्यास रुपये ०१ हजार ५०० रुपयांची लाच घेण्यास भाग पाडले होते.व लाचलुचपत विभागाला कळवून तलाठी यांना दीड हजारांची लाच घेण्यास प्रवृत्त केले होते.या संबंधी कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयासमोर विशेष गुन्हा दाखल झाला होता.त्याच खटला क्रं.०२/२०१२ हा दाखल झाला होता.त्यात तलाठी गटकळ यांना दोषी धरून कायद्यातील सर्वात मोठी शिक्षा दिली होती.त्या नंतर तलाठी गटकळ यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठात अपील क्रं.२६/२०१५ दाखल केले होते.त्याचा निकाल नुकताच लागला आहे.त्यात तलाठी के.एम.गटकळ यांना न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून निर्दोष मुक्त केले आहे.
दरम्यान या खटल्यात अड्.शंतनू धोर्डे यांनी तक्रारदार याची ७/१२ उताऱ्यावर चुकीची व बेकायदेशीर नोंद घेण्याचे तलाठी यांनी नाकारले होते.त्या बाबत लोणी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती.त्या रागातून फिर्यादी याने लाच लुचपत विभागाकडे फेब्रुवारी २०१२ मध्ये तक्रार दाखल केली होती.
त्या बाबत तपास होऊन त्या विरुद्ध कोपरगाव येथील न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झाले होते.यात तलाठी गटकळ यांनी पैसे मागीतले नव्हते.हे सरकारी पंचाच्या साक्षित व उलट तपासात सिद्ध केले होते.शिवाय तक्रार हि तक्रारदार याने आपल्या मेहुण्यामार्फत दाखल केली होती याकडे लक्ष वेधले होते.
तक्रारदार व लोकसेवक यांच्याशी संवादात लोकसेवक गटकळ हे कोठेही पैशाची मागणी करत नाही हे सप्रमाण सिद्ध केले होते.शिवाय हि लाचेची तक्रार दाखल होण्या अगोदर तक्रारदार याचे विरुद्ध भा.द.वि.कलम ४२० व ३४ प्रमाणे गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.त्यात तक्रारदार यास दुरुस्त ७/१२ उतारा लागत होता.तलाठी गटकळ यांनी त्यास नकार दिला म्हणूनच लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती हि बाब लक्षात आणून दिली होती.व उलट तपासात तक्रारदार याने मान्य केल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले होते.त्या नंतर उच्च न्यायालयाने आरोपी तलाठी गटकळ यांना भ्रष्टाचार कायद्यातून मुक्त केले आहे.त्या निकालाचे तलाठी गटकळ यांनी स्वागत केले आहे.
उच्च न्यायालयात आरोपीच्या वतीने जेष्ठ विधीज्ञ व्ही.डी. सपकाळ व अड्.शंतनू धोर्डे यांनी काम पाहिले आहे.