जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

अपघात प्रश्नी चालकांस एक वर्षाचा सश्रम कारावास,२५ हजारांचा दंड

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राहाता शहरातील नवनाथनगर येथील रहिवासी असललेल्या अपे रिक्षास (क्रं.एम.एच.१७ व्ही.१६२०) दि.२२ मार्च २०१३ रोजी सायंकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास चुकीच्या बाजूने समोरून येणाऱ्या इंडिका कारने (क्रं.एम.एच.१७,ए. ई.१२७५) कोकमठाण शिवारात विजय वक्ते यांचे वस्तीजवळ नगर-मनमाड रोडवर जोराची धडक देऊन त्यातील तरुण प्रवासी शाम राठोड (वय-१९) हा ठार तर चार प्रवाशी जखमी केल्या प्रकरणाची कोपरगाव येथील अतिरिक्त न्यायदंडाधिकारी एस.ए.डोईफोडे यांच्या न्यायालयात नुकतीच सुनावणी होऊन त्या अपघातास कारणीभूत ठरलेला संवत्सर येथील इंडिंका कार चालकास गणेश संभाजी पिंपळे (वय-३२) यांना एक वर्षाचा सश्रम कारावास ठोठावला आहे.

रिक्षा व इंडिका यांच्यात झालेल्या अपघातात इंडिका चालका विरुद्ध कोपरगाव येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात हा खटला वर्ग केला होता.त्या प्रकरणी नुकतीच सुनावणी पूर्ण झाली आहे.यातील आरोपी गणेश पिंपळे यास भा.द.वि.कलम ३०४ अंतर्गत १ वर्ष सश्रम कारावास तर कलम २७९ अंतर्गत ६ महिने सश्रम कारावास,तर कलम ३३७ अंतर्गत ६ महिने तर ३३८ अंतर्गत १ वर्ष,सश्रम कारावास तर मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत ६ महिने सश्रम कारावास ठोठावला आहे.तर मयताचे नातेवाईक दुर्गा रामसिंग राठोड यांना २५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,राहाता तालुक्यातील अपे चालक गणेश आसाराम सोनवणे यांचा आपे रिक्षा द्वारे प्रवासी वाहतूक करण्याचा व्यवसाय असून ते शिर्डी-ते कोपरगाव या मार्गावर आपली रिक्षा चालवत होते.ते दि.२२ मार्च २०१३ रोजी आपल्या काही प्रवाशांना घेऊन वैजापूर येथील अंबिका मातेच्या यात्रेच्या कार्यक्रमास घेऊन गेले होते. व सायंकाळी घरी जाण्यासाठी निघाले असता सायंकाळी ७.१५ वाजता कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण हद्दीत त्यांना नगर-मनमाड रोडवरुन चुकीच्या बाजूने एक इंडिका कार समोरून येऊन तिने त्यांना जोराची धडक दिली होती.त्यात त्या रिक्षातील प्रवासी शाम रामसिंग राठोड हे आधी गंभीर जखमी झाले होते व उपचारा दरम्यान ठार झालेच होते.तर स्वतः रिक्षा चालक गणेश सोनवणे,व अन्य प्रवासी दुर्गा रामसिंग राठोड (वय-४०),अजय रामसिंग राठोड,जया रामसिंग राठोड,राणी रामसिंग राठोड आदी एकाच घरातील चार जण जखमी झाले होते.या बाबत रिक्षाचालक गणेश सोनवणे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.९६/२०१३ भा.द.वि.कलम २७९,३३७,३३८,१२७,मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४(अ),(ब), प्रमाणे संवत्सर ता.कोपरगाव येथील इंडिका चालक गणेश पिंपळे याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणी कोपरगाव पोलिसांनी कोपरगाव येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात हा खटला वर्ग केला होता.त्या प्रकरणी नुकतीच सुनावणी पूर्ण झाली आहे.यातील आरोपी गणेश पिंपळे यास भा.द.वि.कलम ३०४ अंतर्गत १ वर्ष सश्रम कारावास तर कलम २७९ अंतर्गत ६ महिने सश्रम कारावास,तर कलम ३३७ अंतर्गत ६ महिने तर ३३८ अंतर्गत १ वर्ष,सश्रम कारावास तर मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत ६ महिने सश्रम कारावास ठोठावला आहे.तर मयताचे नातेवाईक दुर्गा रामसिंग राठोड यांना २५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.भरपाई न दिल्यास तीन महिने साधा कारावास देण्यात आला आहे.सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या आहेत.या खेरीज आरोपी चालकाचा चालक परवाना पुढील सहा महिन्याकरिता निलंबित केला आहे.त्यासाठी परिवहन विभागाचे श्रीरामपूर येथील वहान निरीक्षक यांना आदेशाची परत रवाना केली आहे.
या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे सहाय्यक अभोयोक्ता एस.ए.व्यवहारे यांनी काम पाहिले तर आरोपीच्या वतीने अड्.नितीन पोळ यांनी काम पाहिले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close