जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

कोपरगावात कायद्याच्या विद्यार्थ्यांचा दाखला अडवला,उच्च न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव येथील स्व.श्री.नामदेवराव परजणे लॉ कॉलेजचा विद्यार्थी वैभव दीपक बागुल (वय-२५) रा.शिवाजी रोड कोपरगाव या विद्यार्थ्याने कायदा विषयाची पदवी संपादन केल्यानंतर औरंगाबाद येथील वरीष्ठ महाविद्यालयांत एल.एल.एम.मध्ये प्रवेश घेण्यासाठी आपला दाखला मागितला असता त्याला तो संस्थाचालक हिरालाल महानुभाव यांनी नाकारला आला असून या विद्यार्थ्याने संस्थाचालक व प्राचार्य यांची वारंवार मिनतवारी करूनही उपयोग झाला नाही.अखेर वैतागून मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असून औरंगाबाद खंडपीठाने संस्थांचालकास कारणे दाखविण्याची नोटीस बजावली आहे.त्यामुळे विद्यार्थी आणि नगर जिल्ह्यातील संस्थाचालकांच्या वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

कोपरगावात एल.एल.बी.चे उच्च शिक्षण पूर्ण झाल्यावर संस्थाचालक व प्राचार्य यांचेकडे दाखला मागितला असता तो देण्यास नकार दिल्याने अखेर वैभव बागुल या विद्यार्थ्याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठात धाव घेऊन अड्.भागवत यांचे मार्फत दावा (क्रं.१३९३९/२०२१) दाखल केला आहे.बाबत औरंगाबाद खंडपीठात दि.१४ डिसेंबर रोजी सुनावणी संपन्न झाली असून त्यात न्या.एस.व्ही.गंगापूरवाला व न्या.एस.जी.दिगे यांच्या खंडपीठाने शिक्षण संस्था चालक यांना,”कारणे दाखवा नोटिस” बजावली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,याचिकाकर्ता विद्यार्थी हा कोपरगाव येथील शिवाजी रोडचा रहिवासी आहे.त्याने अत्यन्त गरिबीतून उच्च शिक्षण घेतले आहे.व वर्तमानात उच्च शिक्षण घेण्याचा त्याचा मानस आहे.त्याने सन-२०१६ मध्ये कोपरगाव येथे सी.ए.टी.परीक्षा उत्तीर्ण होऊन कोपरगाव शहरातील कोपरगाव तालुका विद्यार्थी सहाय्यक समिती संचलित स्व.श्री.नामदेवराव परजणे पाटील विधी महाविद्यालयांत बी.ए.एल.एल.बी.साठी पाच वर्षीय अभ्यासक्रमात प्रवेश घेतला होता.याच वर्षी हा विद्यार्थी चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाला आहे.त्याला अजून वरचे उच्च शिक्षण घेण्याची गरज वाटत आहे.त्याने यापूर्वी पुणे येथील अभिनव विधी महाविद्यालयात ‘मेडिकल ज्यूरीसप्रुडेस’ या अभ्यासक्रमात प्रवेश मिळवून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे.या खेरीज कामगार कायदा व कामगार कल्याण या अभ्यास क्रमात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे.आता एल.एल.बी.उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने पुढील शिक्षण औरंगाबाद येथील घेण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांचेकडे पदवी पच्छात शिक्षण घेण्यासाठी अर्ज करून दि.२२ नोव्हेंबर रोजी प्रवेश निच्छित केला आहे.त्यामुळे विद्यापीठाने त्याचा प्रवेश अंतिम करण्यासाठी त्याकडे कोपरगाव येथील परजणे महाविद्यालयाचा मूळ दाखला मागितला आहे.तो आपला दाखला घेण्यासाठी महाविद्यालयांत दि.१३ नोव्हेंबर रोजी गेला असता महाविद्यालयातील हिशेब करून उर्वरित शुल्क भरून टाकले आहे.व ते शुल्क भरले असता व दाखला मागितला असता प्राचार्य व महाविद्यालायचे संस्थाचालक हिरालाल महानुभाव यांनी तो देण्यास चक्क नकार दिला आहे.त्या विद्यार्थ्याने याबाबत सम्बधित महाविद्यालयास कळवले.व तो दाखला परस्पर टपाली खर्चाने मागावून घेण्याची विनंती केली.मात्र तरीही संस्था चालक यांनी तो देण्यास नकार दिला आहे.त्या बाबत विनंती केली असता त्यांनी,”तुला दाखला देणार नाही तुला काय करायचे ते करुन घे”असे महानुभाव यांनी धमकावले आहे.त्यामुळे आपले कधीही न भरून येणारे नुकसान होणार आहे.बागुल यांनी विद्यार्थी याने राज्याचे शिक्षण मंत्री,पुणे विद्यापीठ व अन्य संबंधितांना अर्ज केले आहे.मात्र अद्याप न्याय मिळाला नाही.अखेर बागुल या विद्यार्थ्याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठात धाव घेऊन अड्.भागवत यांचे मार्फत दावा (क्रं.१३९३९/२०२१) दाखल केला आहे.बाबत औरंगाबाद खंडपीठात दि.१४ डिसेंबर रोजी सुनावणी संपन्न झाली असून त्यात न्या.एस.व्ही.गंगापूरवाला व न्या.एस.जी.दिगे यांच्या खंडपीठाने शिक्षण संस्था चालक यांना,”कारणे दाखवा नोटिस” बजावली आहे.त्यामुळे संस्थाचालक काय भूमिका घेतात याकडे नागरीक,विद्यार्थी,व जिल्ह्यातील संस्थाचालकांचे लक्ष लागून आहे.विद्यार्थ्याच्याव वतीने अड्.भागवत हे काम पहात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close