जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

न्यायासाठी महिलांनी सामाजिक दडपण झुगारण्याची गरज-न्या.डोईफोडे

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

संवत्सर-(प्रतिनिधी)

विविध समाजातील बहुतांशी महिलांना स्वत:विषयी कायद्याची माहिती नसल्याने स्वतःवर अन्याय झाला तरी सामाजिक दडपणापोटी दाद मागण्यासाठी त्या पुढे येत नाहीत.महिलांमधील ही मानसिकता घातक असून त्यांनी दडपण झुगारणे गरजेचे असून याबाबत परिवर्तन करण्यासाठी सामाजिक संघटनांसह प्रसार माध्यमांनी जनजागृती करण्याची आज नितांत गरज आहे असे प्रतिपादन कोपरगांव येथील दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालयाचे सहदिवाणी न्यायाधीश ए.सी.डोईफोडे यांनी कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य कारभारात महिलांना सन्मानाची व आदराची वागणूक मिळत होती.साडेचारशे वर्षानंतर आज विविध क्षेत्रात महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा कायदा करुनही महिलांवरील अत्याचार कमी होत नाहीत ही मोठी शोकांतिका आहे.महिलांच्या सबलिकरणाच्या केवळ घोषणाच ऐकायला मिळतात”-न्या.ए.सी.डोईफोडे,वरिष्ठ न्यायाधीश वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय.

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारत सरकार व सर्वोच्य न्यायालय यांच्या अंतर्गत कार्यरत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये “आझादी का अमृतमहोत्सव” या शिर्षकाखाली संवत्सर येथे ग्रामपंयायतीच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कायद्यांबाबतच्या जनजागृती शिबीरात न्या.डोईफोडे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीय मकरंद बोधनकर अध्यक्षस्थानी होते.

सदर प्रसंगी जिल्हा न्यायाधीश सयाजीराव कोऱ्हाळे,सरकारी वकील अशोक वहाडणे,कोपरगांव बार असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष अॅड.शिरीष लोहकणे,अॅड.शंतनू धोर्डे,अॅड.जयंत जोशी, अॅड.गंगावणे,अॅड.बढे,जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे,सरपंच सुलोचना ढेपले, उपसरपंच विवेक परजणे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. उपस्थित सर्व न्यायाधीशांचा व वकील मंडळींचा गांवाच्यावतीने सत्कार करण्यात आला. कोपरगांव न्यायालयाचे वरिष्ठ अधिकारी अनंत सोनपिसारे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,” समाजीतील ज्या महिलांनी संघर्षामधून आपले ध्येय गाठले आहे अशा महिलांच्या प्रेरणादायी यशोगाथांना प्रसार माध्यमांनी चांगल्या प्रकारे प्रसिध्दी दिल्यास इतर महिलांना त्यातून प्रेरणा मिळू शकेल असे सांगून न्या.डोईफोडे यांनी कायद्याविषयीचे ज्ञान सर्वसामान्य लोकांमध्ये नसल्याने आज न्यायालयांमध्ये प्रचंड खटले दाखल आहेत.स्थानिक पातळीवर भांडणे,तंटे मिटविण्यासाठी सामाजिक संघटनांसह सुशिक्षीत तरुणांनी पुढाकार घेण्याची नितांत गरज आहे.गांवातील भाऊबंदकी गांवातील चावडीवरच मिटली पाहिजे.ती न्यायालयापर्यंत गेली की,संसार व आयुष्य बरबाद होऊन जाते.त्यासाठी सामोपचाराने वाद मिटावेत असे मार्गदर्शन करुन संवत्सर गांवासाठी स्व.नामदेवराव परजणे आण्णा यांनी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले.जिल्ह्याला विकासाची दिशा देणारे गांव म्हणून संवत्सरचा उल्लेख करणे क्रमप्राप्त ठरते असेही ते म्हणाले.

जिल्हा न्यायाधीश मकरंद बोधनकर,जिल्हा न्यायाधीश सयाजीराव कोन्हाळे यांनीही कायद्याविषयी समाजात जनजागृतीची गरज असल्याचे मार्गदर्शन केले.यानिमित्ताने महानुभाव आश्रम परिसरात वृक्षारोपन करण्यात आले.शिबीरासाठी ज्येष्ठ कार्यकर्ते पंढरीनाथ आबक, लक्ष्मणराव साबळे,शांताराम परजणे,खंडू फेपाळे,सोमनाथ निरगुडे,लक्ष्मणराव परजणे,दिलीपराव ढेपले,महेश परजणे,प्रशांत बारहाते,बाबासाहेब परजणे,बाळासाहेब दहे,नामदेवराव पावडे,दिलीप परजणे,संभाजी भोसले,बापुसाहेब तिरमखे,अनिल आचारी,संजय भाकरे,हबीबभाई तांबोळी, मधुकर साबळे,सतीश काळे,कल्याणी भाकरे,प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अनिकेत खोत,मुख्याद्यापक फय्याजखान पठाण यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य,ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.उपस्थितांचे जि.प.सदस्य राजेश परजणे यांनी आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close