न्यायिक वृत्त
कोपरगावातील ‘त्या’आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील मढी बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील नवविवाहिता जयश्री विक्रम गुंजाळ हिचे त्यांच्याच शेतातील विहिरीत दि.३० ऑक्टोबर रोजी सकाळी मृतदेह आढळून आल्याने या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात सदर महिलेचे पिता बाबासाहेब आहेर रा.प्रवरानगर यांनी आरोपी नवरा आरोपी नवरा विक्रम गुंजाळ,सासू नंदाबाई उर्फ अलका राजेंद्र गुंजाळ,सासरा राजेंद्र हरिभाऊ गुंजाळ यांचे गुन्हा दखल केला होता.त्यांना कोपरगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समोर तालुका पोलिसांनी हजर केले असता त्यांना ०३ नोव्हेम्बर पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी आरोपी नवरा विक्रम गुंजाळ,सासू नंदाबाई उर्फ अलका राजेंद्र गुंजाळ,सासरा राजेंद्र हरिभाऊ गुंजाळ यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून त्यांना कोपरगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रफिक शेख यांचे समोर हजर केले होते.त्या वेळी त्यांनी आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती.त्यात हि पोलीस कोठडी सूनावली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,मयत नव विवाहित तरुणी जयश्री गुंजाळ रा.मुखेड हल्ली (प्रवरानगर,लोणी ) हिचे लग्न आठ महिन्यांपूर्वी कोपरगाव तालुक्यातील मढी बुद्रुक येथील किराणा व्यावसायिक विक्रम गुंजाळ याचेशी झाला होता.नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर दोघांत काही माहेराहून पाच तोळे सोने आणावे या कारणावरून घरात नवरा,सासू,सासरे यांच्यात कुरबुरी सुरु झाल्या होत्या.
दरम्यान दि.३० ऑक्टोबर रोजी सकाळी संबधीत महिला सकाळी ४.३० वाजेच्या सुमारास घराच्या ती सौचास जाते म्हणून बाहेर पडली होती.त्या नंतर सकाळी घरातील नातेवाईकांनी सर्वत्र तिचा शोध घेतला असता ती विहिरीत मिळून आली नव्हती.मात्र वस्तीनजीक साधारण ५०० फुटावर असलेल्या ग.क्रं.४९ मध्ये ती विहिरीत मिळून आली होती.
दरम्यान सदर तरुणीचे प्रवरानगर येथील वडील बाबासाहेब आहेर यांनी मात्र कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात मयत तरुणीचा नवरा विक्रम गुंजाळ,सासू नंदाबाई उर्फ अलका राजेंद्र गुंजाळ,सासरा राजेंद्र हरिभाऊ गुंजाळ यांचे विरुद्ध गु.र.क्रं.३७३/२०२१ हुंडा बळी कलम ३०४ (ब),४९८(अ),५०४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.व त्यात त्यांनी,” सासू व नवरा यांनी मयत तरुणीस तिने,”माहेराहून पाच तोळे सोने आणावे,लग्न साधेपणाने केले,संसारोपयोगी साहित्य दिले नाही,या कारणावरून शारीरिक,मानसिक छळ केला होता.त्यातून हि घटना घडून आली असल्याचा आरोप केला होता.मढी बुद्रुक येथे मयत तरुणीचे नातेवाईक जमा झाल्याने व त्यांनी मयत तरुणीच्या सासरच्या नातेवाईकांवर आरोप प्रत्यारोप सुरु केल्यावर त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आश्रय घेऊन आपला बचाव केला होता.
या बाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी आरोपी नवरा विक्रम गुंजाळ,सासू नंदाबाई उर्फ अलका राजेंद्र गुंजाळ,सासरा राजेंद्र हरिभाऊ गुंजाळ यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून त्यांना कोपरगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रफिक शेख यांचे समोर हजर केले होते.त्या वेळी त्यांनी आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती.तर आरोपींच्या वतीने अड्.यांनी युक्तिवाद केला होता. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून आरोपींना तीन नोव्हेम्बर पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आव्हाड हे करीत आहेत.