जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

कोपरगाव तालुक्यातील ‘तो’ फरार आरोपी अखेर जेरबंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील पश्चिमेस सुमारे नऊ कि.मी.अंतरावर असलेल्या कुंभारी ग्रामपंचायत हद्दीतील महावितरण कंपनीच्या उपकेंद्राजवळ गोदावरी नदी पात्रात त्याच गावातील आरोपी नवनाथ सजन कदम याने दि.२५ ऑगष्ट रोजी आपल्या विना क्रमांकाच्या निळ्या स्वराज-७३५ या ट्रॅक्टरच्या व लाल रंगाच्या ट्रॉलीच्या सहाय्याने रात्री सुमारास सुमारे १० हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू अवैध रित्या नेताना आढळून आल्याने त्याच्या विरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता मात्र यातील आरोपीने गुंगारा दिला होता त्यास कोपरगाव तालुका पोलिसांनी नूकतेच जेरबंद केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

कोपरगाव तालुका पोलीस त्याच्या शोधात होते.मात्र त्याने नेक वेळा गुंगारा दिला होता.मात्र त्याचा ठावठिकाणा नुकताच पोलिसांना मिळाला होता.त्यानुसार तालुका पोलिसांनी धाड टाकून त्यास जेरबंद केले आहे.व कोपरगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री शेख यांच्यासमोर हजर केले असता त्यास न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद एकूण त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जाधव यांनी दिली आहे.

गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करण्यास जिल्हाधिकारी व उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठाने निर्बंध घातले असताना सुद्धा कुंभारी येथील आरोपी नवनाथ कदम याने आपल्या वरील विनाक्रमांकाच्या स्वराज-७३५ या निळ्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने दि.२५ ऑगष्ट रोजी रात्री ०८.४० वाजेच्या सुमारास महावितरण कंपनीच्या उपकेंन्द्रानजीक असलेल्या गोदावरी नदी पात्रातून सुमारे १० हजार रुपये किमतीची अवैध एक ब्रास वाळू चोरून नेताना आढळून आला होता.घटनेनंतर तो फरार झाला होता.व तो अनेक दिवसापासून पोलिसांना गुंगारा देत होता.मात्र तो लपलेली जागेची गुप्त खबर कोपरगाव तालुका पोलिसांना लागली असता त्यांनी तातडीने त्या ठिकाणी धाड टाकली असता त्यांना वरील ट्रॅक्टर चालक वाळू चोरी करताना रंगेहात सापडला होता.त्या विरोधात कोपरगाव तालुका पोलिसांत फिर्यादी पोलीस कर्मचारी अंबादास वाघ यांनी गुन्हा दाखल केला होता.या छाप्या नंतर आरोपी कदम याने घटनास्थळाहून धूम ठोकली होती.कोपरगाव तालुका पोलीस त्याच्या शोधात होते.मात्र त्याने नेक वेळा गुंगारा दिला होता.मात्र त्याचा ठावठिकाणा नुकताच पोलिसांना मिळाला होता.त्यानुसार तालुका पोलिसांनी धाड टाकून त्यास जेरबंद केले आहे.व कोपरगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री शेख यांच्यासमोर हजर केले असता त्यास न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद एकूण त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जाधव यांनी दिली आहे.

कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३१५/२०२१ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक व्ही.एन.कोकाटे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close