जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

कोपरगाव नगरपरिषदेत कायदेविषयक शिबिर संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषद व तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव नगरपरिषद सह टाकळी,चांदेकसारे,एस.जी.विद्यालय,दहिगाव बोलका,आदी ठिकाणी कायदेविषयक शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.

लिगल सर्व्हिसेस अॅक्टप्रमाणे राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरण,राज्य विधीसेवा प्राधिकरण,जिल्हा विधीसेवा प्राधिकरण आणि तालुका विधीसेवा समिती अशा चार स्तरावर प्राधिकरणाचे काम चालते.जिल्हा प्राधिकरणाचे चेअरमन हे मुख्य जिल्हा न्यायाधीश असतात.त्यानंतर सचिव व सदस्य यामध्ये प्रामुख्याने जिल्हाधिकारी,पोलिस अधिक्षक,मुख्य न्यायदंडाधिकारी वकील संघाचे अध्यक्ष,सरकार नियुक्त पाच वकील सदस्य,यांचा समावेश असतो.


महिला, लहान मुले, अनुसूचित जाती व जमातीचे सदस्य, ७२ हजार रुपयांपेक्षा वार्षिक उत्पन्न कमी असलेल्या कुटुंबातील सदस्य,औद्योगिक कामगार, तुरुंग व कस्टडीतील बंदी, विपत्ती, वांशिक हिंसाचार, जातील हिंसाचार, नैसर्गिक आपत्ती किंवा औद्योगिक आपत्तींना बळी पडलेल्या व्यक्ती,अपंग व्यक्ती अशा विविध स्तरातील नागरिकांना मोफत कायदेशीर मदत करणे, हे जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे महत्त्वाचे काम आहे. या शिवाय कॉलेजस्तरावर,गावपातळीवर कायदे विषयक जनजागृती करण्यासाठी शिबिरांचे आयोजन करणे,ज्येष्ठ नागरिकांसाठी शिबीर घेणे,अशी विविध कामे विधिसेवा प्राधिकरण करते.मध्यस्थ केंद्रात कौटुंबिक आणि इतर वाद तडजोडीने मिटवण्यासाठी देखील प्राधिकरणाचे प्रयत्न असतात. त्या साठी प्रशिक्षित न्यायाधीशांची एक टीम कार्यरत आहे. या शिवाय लोकअदालत,फिरते लोकअदालत असे विविध उपक्रम विधिसेवा प्राधिकरण राबवते.कोपरगाव शहरासह तालुक्यात टाकळी,चांदेकसारे,दहिगाव बोलका,एस.जी.विद्यालय आदी विविध ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत या शिबिराचे आज आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास कोपरगाव जिल्हा न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश श्री बोधनकर,एस.बी.कोऱ्हाळे,जिल्हा न्यायाधिश कनिष्ठ स्तर ए.सी.डोईफोडे,रफिक ए.शेख,वरिष्ठ स्तर न्या.व्ही.यु.मिसाळ,श्रीमती एस.एन.सचदेव मॅडम,सरकारी वकील अशोक वहाडणे,माजी अध्यक्ष अड.अशोक टुपके,वकील संघाचे अध्यक्ष अड.शिरीशकुमार लोहकणे,अड.संजय मंडलिक,कोपरगाव लायन्स क्लबचे अध्यक्ष राम थोरे,अड.चांगदेव वाबळे,अड.नितीन गंगावणे,अड.योगेश खालकर,अड.अमोल टेके,अड.जी.बी.मोकळं,अड.पी.बी.जाधव.अड.जी.बी.भोकरे,आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर न्यायाधीशांचे स्वागत व प्रास्तविक कोपरगाव नगपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी केले.याप्रसंगी मार्गदर्शन करताना मान्यवर न्यायाधीश यांनी कायदा समजून घेणे किती महत्वाचे आहे.आपली अधिकारी कर्मचारी म्हणून लोकसेवक या नात्याने किती जबाबदारी आहे.कायद्याचे पालन,आपण दैनंदिन करत असलेल्या कृती ही आपले आंतरिक मन हे चांगले वागणे वाईट वागणे याविषयक सांगत असते. त्याच बरोबर कार्य कार्यालयात विशाखा समितीचे जबाबदारी कर्तव्य.प्रत्येक अधिकारी कर्मचारी,सफाई कर्मचारी प्रत्येकाने आपले काम प्रामाणिकपणे व विवेकबुद्धीने केले तर आपल्या हातून कुठलीही चूक घडणार नाही.लोकसेवा केल्याचा आनंद आपल्याला मिळेल.काही वेळेस कर्मचारी आपल्या गरजा भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज घेतात व त्या कर्जाच्या परतफेडीच्या बदल्यात भरमसाठ व्याज देऊन कुटुंबावर उपासमारीची वेळ आणतात त्यामुळे प्रत्येकाने आपल्या गरजा नियंत्रणात ठेवा.
आपल्या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सर्व अधिकारी कर्मचारी यांनी सुसंवाद साधून योग्य ते मार्गदर्शन करावे.
विधी सेवा समिती मार्फत मोफत कायदेविषयक ज्ञान व सल्ला देण्यात येतो आदी विषयांवर सविस्तर असे मार्गदर्शन जिल्हा न्यायाधीश कोऱ्हाळे यांनी केले.
न्यायाधीश श्री डोईफोडे यांनी न्यायव्यवस्था सर्वांसाठी एकसारखीच आहे याविषयक चित्रफीत सर्वांना दाखवली.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महारुद्र गालट यांनी केले तर उपस्थितांचे आभार हर्षवर्धन सुराळकर यांनी मानले.
या शिबिरास नगरपरिषद कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close