न्यायिक वृत्त
तरुणीची आत्महत्या,कोपरगावातील ‘त्या’आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत हद्दीत सासर तर नाशिक येथे माहेर असलेल्या शीतल अनिल कांबळे (वय-१९) या तरुणीने आपल्याच राहत्या घरात दि.३१ ऑगष्ट रोजी सकाळी ०६ वाजे पूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेतील आरोपी नवरा अनिल राजेंद्र कांबळे यास कोपरगाव शहर पोलिसांनी अटक करून काल कोपरगाव प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी क्रं.२ श्री दहिफोडे यांचे समोर हजर केले असता दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीस ०८ सप्टेंबर पर्यंत कोठडी सुनावली आहे.
कोपरगाव शहर पोलिसानी टाकळी येथील विवाहित तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी आरोपी अनिल कांबळे यास अटक करून नुकतेच कोपरगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी क्रं.२ यांचे समोर हजर केले असता आरोपीच्या वतीने अड्.गंगावणे यांनी आरोपीचा बचाव केला तर कोपरगाव शहर पोलिसांच्या वतीने सरकारी अभियोक्ता एस.ए.व्यवहारे यांनी त्यास जोरदार हरकत घेतली आरोपीचा तपास करावयाचा असून त्यास पोलीस कोठडीची मागणी केली.अखेर त्यास न्यायालयाने दि.०८ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदरचे सवित्तर वृत्त असे की,कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या व टाकळी ग्रामपंचायत हद्दीत सासर असलेल्या शीतल कांबळे या तरुणीचे सन-२०१६ साली वाजत-गाजत टाकळी येथील तरुण अनिल राजेंद्र कांबळे यांचेशी लावून देण्यात आले होते.या कुटुंबात सासू,नवरा,दीर,जावं असे सदस्य आहेत.सुरुवातीचे नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर या तरुणीला काही दिवसात दोन अपत्ये झाली.मात्र दोन्हीही मुलीचं असल्याने सासरची मंडळी नाराज होती.त्यावरून त्यांच्यात कुरबुर सुरु होती.त्या बाबत तिने वेळोवेळी याबाबत नाशिक येथील माहेर असलेल्या आपल्या नातेवाईकांकडे त्याची कल्पना दिली होती अशी माहिती समजते.मात्र आज दि.३१ ऑगष्ट २०२१ रोजी सकाळीच या तरुणीचा मावसभाऊ आकाश धनराज यशोद यास सासरच्या लोकांनी फोन करून,”तुमची बहीण गंभीर आजारी असून तुम्ही ताबडतोब टाकळी या ठिकाणी निघून या व तिच्या माहेरी हा निरोप सांगा” असा निरोप सांगितला. त्या प्रमाणे आकाश यशोद याने हि माहिती ‘त्या’ तरुणीच्या माहेरी दिली.व ते सर्व आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास आले असता त्यांना येथे मुलगी मयत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली होती.या घटनेने त्यांना धक्का बसला होता.सदर मयत महिलेस कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता वैद्यकीय अधिकांऱ्यानी तिला मृत घोषित केले होते.तिचे शव विच्छेदन करून तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात घेऊन त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास तिच्यावर मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत टाकळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते.या प्रकरणी मुलीची आई वैशाली विनायक जाधव रा.नाशिक यांनी दुसऱ्या दिवशी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात आधी आपल्या दप्तरी या महिलेची अकस्मात मृत्युची नोंद केली होती.मात्र आईने या प्रकरणी आरोपी नवरा अनिल कांबळे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केल्याने या प्रकरणी पोलिसांनी भा.द.वि.कलम ३०६,४९८ (अ),३२३,५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
शहर पोलिसानी या प्रकरणी आरोपी अनिल कांबळे यास अटक करून नुकतेच कोपरगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी क्रं.२ यांचे समोर हजर केले असता आरोपीच्या वतीने अड्.गंगावणे यांनी आरोपीचा बचाव केला तर कोपरगाव शहर पोलिसांच्या वतीने सरकारी अभियोक्ता एस.ए.व्यवहारे यांनी त्यास जोरदार हरकत घेतली आरोपीचा तपास करावयाचा असून त्यास पोलीस कोठडीची मागणी केली.अखेर त्यास न्यायालयाने दि.०८ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे हे करीत आहेत.