जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

राहाता तालुक्यातील ‘ती’ घटना आत्महत्या नव्हे,खून !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

राहाता तालुक्यातील चितळी रेल्वे स्थानकानजीक दि.२० जून रोजी घडलेली घटना ‘हि’ गळफास घेऊन केलेली आत्महत्या नसून ‘तो’ विहिरीच्या कामासाठी अडीच लाखासाठी केलेला शारीरिक व मानसिक छळ असून त्यातून केलेली हत्या असल्याचा संशय काल कोपरगाव जिल्हा व सत्र न्यायालयात संपन्न झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.त्यामुळे या सुनावणीत न्यायालयाने तीनही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला असल्याची माहिती जिल्हा सरकारी पक्षाचे वकील अशोक वहाडणे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

प्रमुख आरोपी मोहित साळुंके व सासरा लक्ष्मण साळुंके व नणंद नीता देशमुख यांनी जामिनासाठी स्वतंत्रपणे दोन अर्ज जामिनासाठी कोपरगाव येथील जिल्हा व स्तर न्यायालयात दाखल केले होते.सरकारी पक्षाचे वतीने सरकारी विधीज्ञ अड्.अशोक वहाडणे यांनी आपली बाजू समर्थपणे मांडताना यात मयत महिलेने आपल्या माहेराहून विहीर खोदण्यासाठी अडीच लाख रुपये आणावे अशी मागणी आरोपींनी केली होती.त्यातील पन्नास हजार रुपये त्यांनी दिले होते.उर्वरित रकमेसाठी मयत महिलेचा पती व अन्य दोन आरोपिंनी छळ केला असल्याचा आरोप केला आहे.

सदरचे सविस्तर वृत असे की,”राहाता तालुक्यातील चितळी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या रेल्वे स्थानकाच्या नजीक रहिवासी असलेल्या ज्योती मोहित साळुंके हि महिला आपल्या राहात्या घरात लटकलेल्या अवस्थेत मिळाल्याचा बनाव केला होता.त्या वेळी मयत महिलेचा आरोपी पतीने आपले सासरे व चंद्रपूर येथील फिर्यादी नानासाहेब तुकाराम अनर्थे यांना भ्रमणध्वनी करून.” तुमची मुलीला डोकेदुखीने चक्कर येत असून ती आजारी असल्याची माहिती देऊन तिला श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी भरती केले आहे” अशी माहिती दिली होती.त्यानंतर मयत महिलेचे वडील व आरोपी मोहित लक्ष्मण साळुंके (मयत महिलेचा नवरा) याने दिलेल्या माहितीनुसार संबंधित रुग्णालयात भेट दिली असता तेथे त्यांना त्यांच्या मुलीचे शव शवागारात ठेवल्याची धक्कादायक माहिती मिळाली.त्या वेळी आरोपीनी त्यांना तिने आत्महत्या केली असल्याचा बनाव केला होता.त्या नंतर मयत महिलेच्या पित्याने संबंधित आपल्या मुलीचे शव ताब्यात घेऊन त्यावर अग्निसंस्कार केले.व त्या नंतर त्यांना या सर्व परिस्थितीचा अंदाज आला.त्या दरम्यान त्यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दाखल करून आरोपी व मयत महिलेचा पती मोहित लक्ष्मण साळुंके,सासरा लक्ष्मण साळुंके,नणंद नीता निलेश देशमुख रा.संगमनेर यांच्यावर दि.२१ जून २०२१ रोजी गु.र.क्रं.१८९/२०२१ भा.द.वि.कलम ३०६,४९८,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.व या प्रकरणी पोलीस चौकशीची मागणी केली होती.

दरम्यान श्रीरामपूर तालुका पोलिसांनी आरोपी नवरा मोहित साळुंके यास अटक केली होती.मात्र मयत महिलेचा सासरा लक्ष्मण साळुंके व नणंद नीता देशमुख हे दोघे मात्र फरार होण्यात यशस्वी झाले होते.त्यांनी नंतर अटक पूर्व जामीन मिळविण्यात यश मिळवले होते.त्या बाबत काल. दि.१२ ऑगष्ट रोजी रीतसर कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे समोर सुनावणी संपन्न झाली आहे.त्यावेळी प्रमुख आरोपी मोहित साळुंके व सासरा लक्ष्मण साळुंके व नणंद नीता देशमुख यांनी जामिनासाठी स्वतंत्रपणे दोन अर्ज जामिनासाठी दाखल केले होते.सरकारी पक्षाचे वतीने सरकारी विधीज्ञ अड्.अशोक वहाडणे यांनी आपली बाजू समर्थपणे मांडताना यात मयत महिलेने आपल्या माहेराहून विहीर खोदण्यासाठी अडीच लाख रुपये आणावे अशी मागणी आरोपींनी केली होती.त्यातील पन्नास हजार रुपये त्यांनी दिले होते.उर्वरित रकमेसाठी मयत महिलेचा पती व प्रमुख आरोपी मोहित साळुंके याने व अन्य आरोपींनी तिचा शारीरिक,मानसिक छळ केला होता.व त्यातच तिचे निधन झाले असल्याचा दावा केला असून या प्रकरणाचा सखोल अभ्यास होणे गरजेचे असल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणले आहे.व त्यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवला जावा अशी मागणी लावून धरली.त्या वेळी आरोपींच्या बाजूने अड्.शंतनू धोर्डे यांनी युक्तिवाद केला आहे.न्यायालयाचे न्या.एम.एस.बोधनकर यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून आरोपींना स्वतंत्र पणे विचार करून त्यांचे जामीन अर्ज फेटाळले आहे.

दरम्यान या प्रकरणी पुढील तपास श्रीरामपूर येथील तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.साळवे व पोलीस उपनिरीक्षक श्री.बोरसे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close