नैसर्गिक आपत्ती
कोपरगाव तालुक्यात मोठे खरीप नुकसान,शेतकऱ्यांचे मदतीकडे डोळे

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात पावसाने गत ६५ वर्षातील सरासरी ओलांडली असून विक्रमी पाऊस झाला आहे.त्यामुळे नंतर नको झालेल्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान केले आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील ७९ गावातील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.त्याचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारने दिले असून कोपरगाव तालुक्यात सुमारे ८६.२० कोटींचे नुकसान झाले असून या नुकसानीची मागणी महसूल विभागाने सरकारकडे केली असल्याची माहिती कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
“कोपरगाव तालुक्यात पावसाने मोठे नुकसान केले असून आधी सखल भागात या पावसाचा फटका बसला होता.मात्र नंतर झालेल्या पावसाने हा तडाखा सर्वत्र बसला असल्याचे दिसून आले आहे.त्यात ७९ गावातील ४६ हजार ३२५ शेतकऱ्यांचे एकूण बाधित क्षेत्र ३४ हजार ४११ हेक्टर असून त्याचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून अद्याप १० ते १५ टक्के बाधित क्षेत्रावरील पंचनामे करण्याचे बाकी आहे”-विजय बोरुडे,तहसीलदार,कोपरगाव.
अ.नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात साधारण १ जून पासून ते आता पर्यंत (साधारण) सरासरी ३६६ मिलीमीटर पाऊस झाला आहे.कालच्या एकाच दिवसात तालुक्यात ४०.६ मि.मी.तर गत महिन्याच्या प्रारंभी विक्रमी ७७ मी.मी.विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.कालच्या एकाच दिवसात सर्वाधिक पाऊस कोपरगाव तालुक्यात सरासरी ४०.६ मिलीमीटर झाला आहे.आता खरीप पिके काढणीला आलेली आहेत.अशातच पावसाचे पुनरागमन झाले आहे.त्यामुळे शेतकरी धास्तावले गेले आहे.सोयाबीन व बाजरी पीकांचे मोठें नुकसान होत आहे.ऑगष्ट पहिल्या आठवड्यात आलेल्या पावसाने झालेल्या नुकसान भरपाईचे पंचनामे सरकारने केले होते.त्यासाठी कोपरगाव तालुक्यात तरतूद केली होती.मात्र दुसऱ्या टप्प्यात पावसाने पुन्हा एकदा नुकसान केल्याने पुन्हा सरकारला पंचनामे करण्याची नामुष्की ओढवली आहे.कोपरगाव तालुका त्यास अपवाद नाही.अनेक रस्त्यांची वाट लागली आहे.
कोपरगाव तालुक्यात पावसाने मोठे नुकसान केले असून आधी सखल भागात या पावसाचा फटका बसला होता.मात्र नंतर झालेल्या पावसाने हा तडाखा सर्वत्र बसला असल्याचे दिसून आले आहे.त्यात ७९ गावातील ४६ हजार ३२५ शेतकऱ्यांचे एकूण बाधित क्षेत्र ३४ हजार ४११ हेक्टर असून त्याचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून अद्याप १० ते १५ टक्के बाधित क्षेत्रावरील पंचनामे करण्याचे बाकी आहे.व त्यासाठी सरकारकडे ८६ कोटी २० लाख रुपयांची मागणी केली आहे.असल्याची माहिती तहसीलदार विजय बोरुडे यांनी दिली आहे.