जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
नैसर्गिक आपत्ती

कोपरगाव तालुक्याच्या नैऋत्येस पावसाचा मोठा तडाखा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख शिवारात वादळी पाऊस झाला असून त्यात अनेक झाडे उन्मळून पडण्यासह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.या कामी महसूल विभागाने स्थळ पंच नामे करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा अशी मागणी निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते अड्.योगेश खालकर यांनी तहसीलदार विजय बोरुडे यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

“नगरसह चार जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता.या दरम्यान ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह हा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती ती खरी उतरत आहे.कोपरगाव तालुकाही त्याला अपवाद नाही. रांजणगाव देशमुख,मनेगाव,काकडी,मल्हारवाडी,डांगेवाडी,अंजनापूर आदी शिवारात काल वादळाने नुकसान झाले आहे.त्याचे पंचमाणे करणे आवश्यक झाले आहे”-अड्.योगेश खालकर,निळवंडे कालवा कृती समिती,नगर-नाशिक.

मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या मान्सूनपूर्व पावसाने जोरदार तडाखा देत आतापर्यंत एकूण ६ जणांचे बळी घेतले आहेत.राज्यातील अनेक भागात आताही पाऊस पडत असून येत्या काही तासांत मुंबई,ठाणे,जळगाव,नगर आणि बीड जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता.या दरम्यान ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह हा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती ती खरी उतरत आहे.

कोपरगाव तालुकाही त्याला अपवाद नाही.कोपरगाव तालुक्याच्या नैऋत्येस साधारण बावीस कि.मी.अंतरावर असलेल्या रांजणगाव देशमुख,मनेगाव,काकडी,मल्हारवाडी,डांगेवाडी,अंजनापूर आदी शिवारात काल वादळासह मोठा पाऊस पडला आहे.त्यात कुक्कुट पालकांचे शेड,घराचे कौल,गाय गोठे,घरे आदींचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान या पहिल्याच मृगाच्या पावसाने बऱ्यापैकी जमिनीची तहान भागली आहे.त्यामुळे खरीप पूर्व मशागतीच्या कामांना वेग येण्यास मदत मिळणार आहे.तर काही ठिकाणच्या पाझर तलावात बऱ्या पैकी जलसाठा वाढला हि समाधानाची बाब आहे.

दरम्यान या वादळी पावसात मोठे नुकसान झाल्याने महसूल विभागाने या भागातील नुकसानग्रस्त गावांची पाहणी करून स्थळ पंचनामे करून त्या बाबत आर्थिक नुकसानीची तरतूद करावी अशी मागणी अड्.खालकर,युवराज गांगवे,रावसाहेब कोल्हे आदींची तहसीलदार यांचे कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.आपल्या मागण्याचे निवेदन त्यांनी नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांना सोपवले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close