निवड
…या सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव तालुक्यात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या धामोरी वि.का.सेवा सहकारी सेवा संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक इफकोचे माजी संचालक चंद्रशेखर कुलकर्णी यांचे नेतृत्वाखाली नुकतीच बिनविरोध पार पडली असून संस्थेच्या अध्यक्षपदी अरुण भाकरे यांची तर उपाध्यक्षपदी प्रा.संदीप जगझाप यांची निवड झाली आहे.नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
स्व.पंडीतराव कुलकर्णी यांनी १९५० साली स्थापन केलेल्या या संस्थेने सुमारे ४० वर्षांपासून बिनविरोध निवडणूकीची परंपरा कायम राखली आहे.संस्थेमार्फत दरवर्षी सभासदांना लाभांश वाटप केला जात असुन कायम सभासदांचे हित जोपासण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे.निवडणुक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोपरगांव तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी,गौतम बँकेचे संचालक पुंडलिक माळी,बाबुराव दरेकर,भास्करराव वाघ,रामराव माळी,के.बी.रोहमारे महाविद्यालय,चासनळीचे प्राचार्य नारायण बारे आदींचे सहकार्य लाभले आहे.
धामोरी विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध संपन्न झाली होती.त्या नंतर आता अध्यक्ष,उपाध्यक्षपदाची निवडणूक निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केली होती.त्यावेळी अध्यक्ष पदाची सूचब चंद्रशेखर कुलकर्णी यांनी मांडली होती त्या सुचनेस राजेंद्र वाघ यांनी अनुमोदन दिले आहे.तर उपाध्यक्षपदांची सुचना चैतन्य कुलकर्णी यांनी मांडली होती त्यास अनुमोदन बाळासाहेब आहिरे यांनी दिले आहे.
स्व.पंडीतराव कुलकर्णी यांनी १९५० साली स्थापन केलेल्या या संस्थेने सुमारे ४० वर्षांपासून बिनविरोध निवडणूकीची परंपरा कायम राखली आहे.संस्थेमार्फत दरवर्षी सभासदांना लाभांश वाटप केला जात असुन कायम सभासदांचे हित जोपासण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे.निवडणुक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोपरगांव तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी,गौतम बँकेचे संचालक पुंडलिक माळी,बाबुराव दरेकर,भास्करराव वाघ,रामराव माळी,के.बी.रोहमारे महाविद्यालय,चासनळीचे प्राचार्य नारायण बारे,देवराम माळी,संस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब खिलारी,कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक मनोज जगझाप,पंडितराव कुलकर्णी पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र वाईकर,उपाध्यक्ष सुनिल जगझाप व सर्व सभासदांनी सहकार्य केले आहे.
सदर प्रसंगी नवनिर्वाचित संचालक सुनिल दरेकर,कैलास बारे,माणिक सोमासे,भाऊसाहेब माळी,सोनुबाई माळी,विमलबाई खिलारी,बापुराव कोळपे आदी मान्यवर उपस्थित होते.निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाचे सहकार अधिकारी कृष्णा वाळके यांनी काम पाहिले.त्यांना सचिव मनोज कुलकर्णी यांनी सहकार्य केले आहे.