निवड
…या पतसंस्थेच्या अध्यक्षपदी रोहमारे,उपाध्यक्षपदी चौधरी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील शरद पवार नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी देवेन गोरखनाथ रोहमारे तर उपाध्यक्षपदी रावसाहेब शंकरराव चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
“अध्यक्षपदाच्या नावाची सूचना सुदाम वाबळे यांनी मांडली त्या सूचनेस महेंद्र काळे यांनी अनुमोदन दिले.उपाध्यक्षपदाच्या नावाची सूचना बन्सी निकम यांनी मांडली त्या सूचनेस व्यंकटेश बारहाते यांनी अनुमोदन दिले आहे.यावेळी सर्व सदस्यांच्या सहमतीने नूतन पदाधिकऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे”-नामदेव ठोंबळ,निवडणूक अधिकारी,कोपरगाव.
शरद पवार नागरी सहकारी पतसंस्थेची २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी होणारी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक काही दिवसांपूर्वी बिनविरोध झाली असून नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड नुकतीच आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक अधिकारी नामदेव ठोंबळ व सहाय्यक निवडणूक अधिकारी ए.आर.रहाणे यांच्या उपस्थितीत पार पडली आहे.
सदर प्रसंगी नवनिर्वाचित संचालक अनिल महाले,महेंद्र काळे,सुदाम वाबळे,व्यंकटेश बारहाते,बन्सी निकम,परवीन तालिब सय्यद,मेघा चंद्रशेखर कडवे,विरेंद्र शिंदे,ज्ञानेश्वर हाळनोर उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षपदाच्या नावाची सूचना सुदाम वाबळे यांनी मांडली त्या सूचनेस महेंद्र काळे यांनी अनुमोदन दिले.उपाध्यक्षपदाच्या नावाची सूचना बन्सी निकम यांनी मांडली त्या सूचनेस व्यंकटेश बारहाते यांनी अनुमोदन दिले आहे.यावेळी सर्व सदस्यांच्या सहमतीने नूतन पदाधिकऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याचे निवडणूक अधिकारी नामदेव ठोंबळ यांनी जाहीर केले आहे.
निवडणुककामी पतसंस्थेचे व्यवस्थापक मंगेश देशमुख यांनी सहकार्य केले आहे.नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष रावसाहेब चौधरी यांचे माजी आ.अशोक काळे आदींनी अभिनंदन केले आहे.