जाहिरात-9423439946
निवड

कोपरगाव तालुक्यातील…या वि.का.संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या वारी विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी काळे गटाचे नवनाथ जाधव व उपाध्यक्षपदी वाल्मिक जाधव यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे.नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

अध्यक्षपदासाठी नवनाथ छबुराव जाधव यांच्या नावाची सूचना दिलीप गायकवाड यांनी मांडली त्यास अनुमोदन संजय जाधव यांनी दिले.उपाध्यक्ष पदासाठी वाल्मिक खंडू जाधव यांच्या नावाची सूचना मधुकर टेके यांनी मांडली त्यास गोकुळ पडघलमल यांनी अनुमोदन दिले.अध्यक्ष,उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक अधिकारी नामदेव ठोंबळ यांनी जाहीर केली आहे.

वारी विविध कार्यकारी सेवा संस्थेची निवडणूक नुकतीच मागील महिन्यात पार पडली असून या निवडणुकीत श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली काळे गटाने कोल्हे गटाला पराभवाची धूळ चारत १३ पैकी १२ जागा जिंकून सोसायटीची सत्ता मिळविली होती.या संस्थेच्या अध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली आहे.

यावेळी अध्यक्षपदासाठी नवनाथ छबुराव जाधव यांच्या नावाची सूचना दिलीप गायकवाड यांनी मांडली त्यास अनुमोदन संजय जाधव यांनी दिले.उपाध्यक्ष पदासाठी वाल्मिक खंडू जाधव यांच्या नावाची सूचना मधुकर टेके यांनी मांडली त्यास गोकुळ पडघलमल यांनी अनुमोदन दिले.अध्यक्ष,उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक अधिकारी नामदेव ठोंबळ यांनी अध्यक्षपदी नवनाथ जाधव व उपाध्यक्षपदी वाल्मिक जाधव यांची निवड जाहीर केली.निवडणूककामी सचिव जालिंदर टेके यांनी सहकार्य केले आहे.

यावेळी संस्थेचे नवनिर्वाचित संचालक मधुकर निवृत्ती टेके,संजय सुभाष जाधव,मच्छिंद्र शंकर टेके,आप्पासाहेब मलिक,चांगदेव शिरसाठ,गोकुळ पलघडमळ,लता टेके,लताबाई मधुकर गोर्डे,रावसाहेब टेके,दीपक गायकवाड तसेच सुभाष जाधव आदी मान्यवरांसह संस्थेचे सभासद व वारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.नूतन पदाधिकाऱ्यांना माजी आ.अशोक काळे व श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.काळे यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close