निवड
एम.पी.एस. सी.परीक्षेत कोपरगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचे यश

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सोनारी येथील रहिवासी व संजीवनी सहकारी कारखान्याचे माजी संचालक स्व.रघुनाथ यशवंत सांगळे यांचे पुतणे व वसंत यशवंत सांगळे यांचे चि.वैभव वसंत सांगळे हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहे.त्यांच्या या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कोणत्याही परीक्षेत अभ्यासात सातत्य,चिकाटी असेल तर यश मिळवण्यात कोणतीही अडचण येत नाही हे आपल्या निकालावरून निष्पन्न झाले आहे”- वैभव सांगळे,उत्तीर्ण विद्यार्थी,सोनारी,ता.कोपरगाव.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षेतील पोलीस उपनिरीक्षक (पी.एस.आय.) संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.त्यात कोपरगाव तालुक्यातील सोनारी येथील रहिवासी तरुण वैभव वसंत सांगळे यांने सर्वाधिक गुणांसह राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे.
एम.पी.एस.सी.ने प्रसिद्धिपत्रकाद्वारे या बाबतची माहिती देण्यात आली आहे. एम.पी.एस.सी.ने पी.एस.आय.संवर्गातील ३७४ पदांसाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी परीक्षा घेतली होती.परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे निकालाकडे लक्ष लागले होते. त्यानुसार एम.पी.एस.सी.ने सर्वसाधारण गुणवत्ता यादी संकेतस्थळावर जाहीर केली आहे.सर्वसाधारण गुणवत्ता यादी उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने तयार करण्यात आली असल्याचे समजत आहे.त्यात वैभव सांगळे याने हे यश संपादन केले आहे.
त्यांच्या या यशाचे कोपरगाव वकील संघाचे ज्येष्ठ सदस्य ॲड.दिलीप लासुरे, ॲड.एस.एम.सांगळे, ॲड . एन.आर. कातकडे,ॲड.प्रशांत कदम आदींनी अभिनंदन केले आहे.चि.वैभव सांगळे हे संजीवनी सहकारी पतसंस्थेचे संचालक जयराम रघुनाथ सांगळे यांचे चुलत बंधू आहेत.